आंबा पिकाला शासनाचे अनुदान; फळबाग लागवडीतून शेतकऱ्यांना नफा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2025 16:00 IST2025-04-30T15:59:43+5:302025-04-30T16:00:19+5:30

शेतकऱ्यांना दिलासा : मनरेगा योजनेतून शेतकऱ्यांना फळबागांसाठी दिले प्रोत्साहन

Government subsidy for mango cultivation; Farmers benefit from orchard cultivation | आंबा पिकाला शासनाचे अनुदान; फळबाग लागवडीतून शेतकऱ्यांना नफा

Government subsidy for mango cultivation; Farmers benefit from orchard cultivation

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर :
जिल्ह्यातील प्रगतीशील आणि युवा शेतकऱ्यांचा प्रायोगिक शेती करण्याकडे कल वाढत आहे. जिल्ह्यात कधीही अन् कुठेही न घेतलेले पीक घेणे व त्यातून उत्पन्नात भर टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे. जिल्ह्यात फळबागेसाठी पोषण वाावरण नाही, तरीही काही शेतकरी प्रयत्न करीत आहे. यामध्ये मोसंबी, संत्रा, कागदी लिंबू, केळी, सीताफळ सोबत विविध फळांची लागवड केली जात आहे. सध्या बाजारात आंब्याला चांगला दर असून, आंब्याच्या विक्रीतून कोकण तसेच अन्य परिसरातील शेतकरी मालामाल होत आहे. मात्र आजही चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकरी पाहिजे तसे फळबागांकडे वळले नसल्याचे चित्र आहे.


जिल्ह्यात खरीप हंगामात धान, कापूस, सोयाबीन या पिकांचेच अधिक क्षेत्र पीक लाळगडीखाली असते. याशिवाय तूर, उडीद, मूग, ज्वारीची लावगड शेतकरी करतात. तसेच रब्बी हंगामात कडधान्य पिकांसह हरभरा, गहू, मका व तेलवर्गीय पिकांची लावगड शेतकरी करीत असतात. ही पिके हंगामी आहेत. जिल्ह्यात फळपीक लावगडीसाठी अद्यापतरी शेतकरी वळले नसल्याचे दिसते. यापुढे सिंचन क्षेत्र वाढल्यास मोठ्या प्रमाणात शेतकरी फळबाग लागवट करू शकतात.


फळबाग योजनेतून अनुदान
भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेमध्ये अनुदान मिळते, शिवाय अन्य योजनाही आहे. जिल्ह्यात काही ठिकाणी आंब्याची लावगड केली आहे.


केशर आंब्यांला मिळतो चांगला भाव
जिल्ह्यात दशहरी, लंगडा आंब्याची लागवड काही शेतकऱ्यांनी केली आहे. केशर आंब्याच्या लागवडीकडे शेतकऱ्यांचा अधिक कल आहे. या आंब्याला बाजारात मोठी मागणी आहे व दरदेखील चांगला मिळतो.

Web Title: Government subsidy for mango cultivation; Farmers benefit from orchard cultivation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.