रिसोर्टच्या नावावर प्लॉटधारकांची ४१ लाख ५० हजारांनी फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2024 14:41 IST2024-12-06T14:40:38+5:302024-12-06T14:41:59+5:30

आरोपीविरुद्ध गुन्हा : पीडितांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे कागदपत्र जमा करण्याचे आवाहन

Fraud of 41 lakh 50 thousand of plot holders in the name of resort | रिसोर्टच्या नावावर प्लॉटधारकांची ४१ लाख ५० हजारांनी फसवणूक

Fraud of 41 lakh 50 thousand of plot holders in the name of resort

लोकमत न्यूज नेटवर्क 
चंद्रपूर :
पर्यटकांना रिसोर्टप्रमाणे कुटी भाड्याने देऊन दरमहा आर्थिक उत्पन्नाचे प्रलोभन दाखवत प्लॉटधारकांची ४१ लाख ५० हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी भार्गवी लॅन्ड ॲन्ड डेव्हलपर्सचा मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. भरत नानाजी धोटे असे आरोपीचे नाव आहे.


आरोपी भरत धोटे (३८, रा. तुकूम) याने भार्गवी लॅन्ड ॲन्ड डेव्हलपर्स या नावाने खासगी कंपनी स्थापन करून अभिकर्ते नियुक्त केले. त्यांच्या माध्यमातून पद्मापूर, अजयपूर, तळोधी (तुकूम), बोर्डा, किटाळी येथे कुट्यांचे बांधकाम केले. 


या कुटी युनिव्हर्स ॲग्रो टुरिझम प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीशी करारनामा करण्याचे आमिष दाखविले. ताडोबात येणाऱ्या पर्यटकांसाठी रिसोर्टप्रमाणे कुटी किरायाने देऊन प्रतिमाह ७ हजार ८३ रुपये देण्याचे प्रलोभन दाखवले. प्रत्येक गुंतवणूकदारांकडून २ लाख ५० हजार रुपये याप्रमाणे एकूण ४१ लाख ५० हजारांची आर्थिक फसवणूक केली.


याप्रकरणी सर्व अन्यायग्रस्तांतर्फे दाताळा म्हाडा कॉलनीचे रहिवासी अशोक भटवलकर यांच्या तक्रारीवरून भरत धोटे याच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला. या प्रकरणात आणखी काही आरोपी ताब्यात घेण्याची शक्यता आहे. पीडित प्लॉटधारकांनी या संदर्भातील कागदपत्रे आर्थिक गुन्हे शाखेकडे जमा करावीत, असे आवाहन गुरुवारी (दि. ५) पोलिस प्रशासनाने केले. 


अशी केली फसवणूक 
चंद्रपूर आर्थिक गुन्हे शाखेचे पथक प्रकरणाचा तपास करत असताना धक्कादायक बाबी पुढे आल्या. या तपासात आरोपी भरत धोटे याने भार्गवी लॅन्ड ॲन्ड डेव्हलपर्स या नावाने खासगी कंपनी स्थापन करून किटाळी येथील डॉ. अमोल पोद्दार यांचे सव्र्व्हे क्र. ७६/३ आणि ७६/४ तसेच चांदा रयतवारी भूमापन क्र. ४१ ५/१ व ४१६ येथेही ले- आऊट तयार केले. प्लॉटच्या विक्रीकरिता ग्राहकांसोबत १०० रुपयांच्या स्टैंप पेपरवर विसारपत्र केल्याचे तपासात आढळून आले.


"संबंधित ले-आऊटमधील प्लॉट घेण्याकरिता विसारपत्र करणाऱ्या लोकांनी त्यांच्याजवळ असलेले संबंधित प्लॉटचे विसारपत्र आणि इतर आवश्यक कागदपत्रे प्रकाशित झाल्यापासून आठ दिवसांच्या आत आर्थिक गुन्हे शाखा चंद्रपूर येथे जमा करावे. या घटनेशी संबंधित सर्व माहिती तपासातून गोळा करणे सुरू आहे." 
- प्रभाकर चिकनकर, पोलिस उपनिरीक्षक आर्थिक गुन्हे शाखा

Web Title: Fraud of 41 lakh 50 thousand of plot holders in the name of resort

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.