वीज कोसळून आठ गाईंचा मृत्यू, लखमापूर येथील घटना

By साईनाथ कुचनकार | Updated: September 21, 2023 17:25 IST2023-09-21T17:24:58+5:302023-09-21T17:25:49+5:30

शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

Eight cows died due to lightning strike in Lakhamapur | वीज कोसळून आठ गाईंचा मृत्यू, लखमापूर येथील घटना

वीज कोसळून आठ गाईंचा मृत्यू, लखमापूर येथील घटना

चंद्रपूर : जिल्ह्यात गुरुवारी सकाळपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली. या पावसामध्ये चंद्रपूर येथून जवळच असलेल्या लखमापूर गावशिवारामध्ये सकाळी ११ वाजताच्या दरम्यान वीज कोसळून आठ गाईंचा मृत्यू झाला. यामध्ये शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

घटनेची माहिती मिळताच तहसीलदार विजय पवार, नायब तहसीलदार डाॅ. जितेंद्र गादेवार यांनी तलाठी तल्हार, पशुवैद्यकीय अधिकारी रामटेके यांच्यासह घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर पंचनामा करण्याच्या सूचना देण्यात आल्या. गाईंची उत्तरीय तपासणी करून अहवाल पाठविण्याचे निर्देशही पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना यावेळी देण्यात आले. मृत गायीच्या मालकांना प्रतिगाय ३७ हजार ५०० रुपयांप्रमाणे तीन लाख रुपयांची नुकसानभरपाई प्रशासनातर्फे देण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे

Web Title: Eight cows died due to lightning strike in Lakhamapur