चंद्रपुरात गोळीबार मनसे कामगार सेनेचा जिल्हाप्रमुख जखमी
By राजेश भोजेकर | Updated: July 4, 2024 16:05 IST2024-07-04T16:01:56+5:302024-07-04T16:05:15+5:30
Chandrapur : रघुवंशी कॉम्प्लेक्समध्ये गोळीबार

District Chief of MNS Worker Sena injured in firing in Chandrapur
चंद्रपूर : शहरातील गजबजलेल्या रघुवंशी कॉम्प्लेक्समध्ये गोळीबार करण्यात आल्याची धक्कादायक घटना गुरुवारी दुपारी 2 वाजताच्या सुमारास घडली. याचा सीसीटीव्ही समोर आला आहे. या गोळीबारात अमन अंधेवार नामक युवक जखमी झाला.
अमन हा महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचा जिल्हाप्रमुख असल्याची माहिती समोर येत असून याच संकुलात त्याचे कार्यालय आहे. जुन्या वैमनस्यातून त्याच्यावर गोळीबार करण्यात आल्याची माहिती आहे. वर्षभरापूर्वी याच ठिकाणी याच आरोपीने अमनच्या लहान भावावर गोळीबार करून पळ काढला होता. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेले रघुवंशी कॉम्प्लेक्स हे व्यावसायिक संकुल असून हा परिसर लोकांनी गजबजलेला असतो. त्यामुळे इथे गोळीबार झाल्याने पोलिसही चक्रावले आहेत. घटनेची लागलीच दखल घेत पोलीस अधीक्षक सुदर्शन मुम्मका घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरू करण्यात आला आहे.