शिवलक्ष्मी पतसंस्थेच्या संचालकांवर कोट्यवधींची फसवणूक केल्याचा गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2025 19:39 IST2025-08-01T19:37:57+5:302025-08-01T19:39:11+5:30

गुंतवणूकदारांनी केली तक्रार : फसवणूक झालेल्यांनी संपर्क साधावा, पोलिसांनी केले आवाहन

Directors of Shivalakshmi Patsanstha booked for fraud worth crores | शिवलक्ष्मी पतसंस्थेच्या संचालकांवर कोट्यवधींची फसवणूक केल्याचा गुन्हा

Directors of Shivalakshmi Patsanstha booked for fraud worth crores

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर :
वरोरा तालुक्यातील शेगाव (बु) येथील शिवलक्ष्मी महिला नागरी सहकारी पत निधी लिमिटेड या संस्थेने अधिक व्याजदर, दामदुप्पट परतावा आणि तत्काळ कर्ज अशा अनेक आमिषांनी नागरिकांची १ कोटी २ लाख ७३ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी गुंतवणूकदारांनी पोलिसात तक्रार दाखल केली असून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फसवणूक झालेल्यांनी आर्थिक गुन्हे शाखा, पोलिस अधीक्षक कार्यालय येथे संपर्क साधावा, असे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे.


गुन्हा दाखल
याप्रकरणी पोलिस ठाणे शेगाव (बु.) येथे भारतीय न्याय संहिता ३१८ (४), ३१६ (२), ३१६ (५), ३ (५) सहकलम ३ एमपीआयडी अॅक्ट १९९९ अन्वये गुन्हा नोंद असून तपास आर्थिक गुन्हे शाखा चंद्रपूर करीत आहे. 


अशी आहे गुन्ह्याची पार्श्वभूमी
शेगाव (बु.) येथील अब्दुल रहेमान शेख इस्माईल यांनी दिलेल्या तक्रारीवरून, मनोज खोंडे, सुभाष चाफले, श्रीकांत घाटे या संचालकांनी एजंट आणि कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून गुंतवणुकीसाठी लोकांना आकर्षित केले. त्यांनी नागरिकांना लखपती योजना, पिकनिक कर्ज, बचत गट कर्ज, दुप्पट परतावा आदी आश्वासने देत गुंतवणूक करून घेतली. मात्र नियोजित परतावा दिला नाही. परिणामी गुंतवणूकदार आर्थिक अडचणीत आले आहेत.


फसवणूक झालेल्यांनी संपर्क करा
गुंतवणूकदारांनी गुंतवणुकीचे प्रमाणपत्र, रक्कम भरल्याची पावती, आधार कार्ड व पॅन कार्ड, बँक पासबुक (राष्ट्रीयीकृत बँक खाते) ची झेरॉक्स, शासनाच्या परिपत्रकानुसार परिशिष्ट-१ नमुन्यातील भरलेला फॉर्म, आर्थिक गुन्हे शाखा, पोलिस अधीक्षक कार्यालय, दुर्गापूर येथे संपर्क पोलिस अधीक्षक का साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे 

Web Title: Directors of Shivalakshmi Patsanstha booked for fraud worth crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.