दहावीच्या निकालात चंद्रपूर जिल्ह्याची कामगिरी ढासळली पण मुली ठरल्या आशेचा किरण

By राजेश मडावी | Updated: May 13, 2025 15:52 IST2025-05-13T15:48:12+5:302025-05-13T15:52:59+5:30

Chandrapur : यंदा ८८.४५ टक्के तर गतवर्षी ९३.५४ टक्के

Chandrapur district's performance deteriorated but girls became a ray of hope | दहावीच्या निकालात चंद्रपूर जिल्ह्याची कामगिरी ढासळली पण मुली ठरल्या आशेचा किरण

Chandrapur district's performance deteriorated but girls became a ray of hope

राजेश मडावी
चंद्रपूर : जिल्ह्यात यंदा दहावीचा निकाल ८८.४५ टक्के लागला आहे. गतवर्षीच्या तुलनेत निकालात ५.०९ टक्क्यांनी घसरण झाली आहे. गतवर्षी दहावीचा निकाल ९३.५४ टक्के लागला होता. दरवर्षीप्रमाणे यंदाही मुलीच सरस ठरल्या आहेत. उत्तीर्ण

मुलींची टक्केवारी ९२.५१ टक्के एवढी आहे. यंदा ३ हजार १३५ विद्यार्थी नापास झाले आहेत. गतवर्षी केवळ १८१० विद्यार्थी नापास झाले हाेते. दहावी परीक्षेला चंद्रपूर जिल्ह्यातून नोंदणी केलेल्या एकूण २७ हजार ४१८ पैकी २७ हजार १६० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. या परीक्षेत ११ हजार ९९९ मुले तर १२ हजार २६ मुली असे एकूण २४ हजार २५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. जिल्ह्यात १२५ परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा झाली. यंदाही मुलांपेक्षा सरस असल्याचे पुन्हा सिद्ध करून दाखविले आहे. मुलींची टक्के ९२.५१ टक्के तर मुलांची टक्केवारी ८४.७३ टक्के एवढी आहे. दहावी परीक्षेचा एकूण निकाल ८८.४५ टक्के लागला आहे.

Web Title: Chandrapur district's performance deteriorated but girls became a ray of hope

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.