चंद्रपूर जिल्ह्यात आज 940 कोरोनामुक्त, 520 पॉझिटिव्ह तर 14 मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 17:34 IST2021-05-21T17:33:57+5:302021-05-21T17:34:10+5:30

मागील 24 तासात 940 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 520 कोरोना बाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून 14 बाधीतांचा मृत्यू झाला आहे.

Chandrapur district today 940 corona cases recovered 520 positive and 14 deaths | चंद्रपूर जिल्ह्यात आज 940 कोरोनामुक्त, 520 पॉझिटिव्ह तर 14 मृत्यू

चंद्रपूर जिल्ह्यात आज 940 कोरोनामुक्त, 520 पॉझिटिव्ह तर 14 मृत्यू

चंद्रपूर  : जिल्ह्यात मागील 24 तासात 940 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 520 कोरोना बाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून 14 बाधीतांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 80 हजार 223 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 71 हजार 927 झाली आहे. सध्या 6 हजार 957 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 4 लाख 49 हजार 944 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 3 लाख 67 हजार 62 नमुने निगेटीव्ह आले आहेत.

आज मृत झालेल्यामध्ये चंद्रपूर शहरातील तुकूम परिसरातील 60 वर्षीय पुरुष, बालाजी वार्ड येथील 83 वर्षीय पुरुष, रामनगर येथील 43 वर्षीय पुरुष, 71 वर्षीय पुरुष, नगीनाबाग येथील 72 वर्षीय महिला.
बल्लारपूर तालुक्यातील 60 वर्षीय महिला, 60 वर्षीय पुरुष. भद्रावती तालुक्यातील टेकाडी येथील 87 वर्षीय महिला. राजुरा तालुक्यातील 53 वर्षीय पुरुष. ब्रह्मपुरी तालुक्यातील हनुमान नगर येथील 77 वर्षीय महिला, किरमिटी मेंढा येथील 70 वर्षीय महिला, मोरगाव येथील 37 वर्षीय पुरुष, नागभीड तालुक्यातील 52 वर्षीय पुरुष, यवतमाळ जिल्ह्यातील चिंचाळा मारेगाव येथील 60 वर्षीय महिलेचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत 1339 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 1241, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 35, यवतमाळ 45, भंडारा 11, वर्धा एक, गोंदिया दोन आणि नागपूर येथील दोन बाधिताचा समावेश आहे.

आज बाधीत आलेल्या 520 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील 147, चंद्रपूर तालुका 28, बल्लारपूर 103, भद्रावती 32, ब्रम्हपुरी 06, नागभिड 03, सिंदेवाही 07, मूल 73, सावली 13, पोंभूर्णा 05, गोंडपिपरी 07, राजूरा 17, चिमूर 03, वरोरा 24, कोरपना 50, जिवती 00 व इतर ठिकाणच्या 02 रुग्णांचा समावेश आहे.

नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच 45 वर्षावरील सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

Web Title: Chandrapur district today 940 corona cases recovered 520 positive and 14 deaths