दहावीच्या निकालात चंद्रपूर जिल्ह्याची घसरण; चिमूर तालुका यंदाही मागेच
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2025 14:06 IST2025-05-14T14:06:00+5:302025-05-14T14:06:55+5:30
पोंभूर्णा तालुका ठरला अव्वल : एक वा दोन विषयांसाठी मिळाली एटीकेटी

Chandrapur district falls in 10th class results; Chimur taluka lags behind this year too
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : तालुकानिहाय निकालात यंदा ९२.७० टक्के घेऊन पोंभुर्णा तालुका अव्वल ठरला. मागील वर्षीप्रमाणे यावर्षीही चिमूर तालुका माघारला आहे. नागपूर बोर्डातून निकालात यंदा जिल्ह्याची घसरण झाली.
पोंभूर्णा तालुक्यात ३१४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली, तर ४११ जणांनी परीक्षा दिली. त्यापैकी ३८१ उत्तीर्ण झाले आहेत. विद्यार्थ्यांची संख्या कमी असली तरी पोंभुर्णाने बाजी मारली. चिमूर तालुका गतवर्षीप्रमाणे यंदाही मागे पडला. या तालुक्यात २ हजार १३१ विद्यार्थ्यांची नोंदणी झाली. २ हजार ११७ जणांनी परीक्षा दिली. त्यापैकी १ हजार ७५८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. एक किंवा दोन विषयांत अपयशी ठरलेल्या विद्यार्थ्यांना ११ वीची प्रवेशाची परवानगी देण्यात आली. मात्र त्यांना १२ वीत प्रवेश घेण्याआधी उत्तीर्ण व्हावे लागेल.
गुणपडताळणीसाठी २८ मे पर्यंत नोंदणी
पुनर्मूल्यांकनास ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी संकेतस्थळावर (http://mahahsscboard.in या संकेतस्थळावर सर्व अटी व शर्थी देण्यात आल्या. उत्तरपत्रिकांचे पुनर्मूल्यांकन करू इच्छिणारे विद्यार्थी बोर्डाच्या संकेतस्थळावर बुधवारी दि.१४ ते २८ मे २०२५ पर्यंत ऑनलाइन नोंदणी करू शकतात. गुणपडताळणीसाठी प्रती विषय ५० रुपये शुल्क ऑनलाइन जमा करावा लागेल.
अंतराला डॉक्टर व्हायचे
अभ्यासाचे वेळापत्रक कधीही चुकवले नाही. त्यामुळे हे यश मिळाले. पुढील शिक्षक घेऊन डॉक्टर बनण्याचे माझे स्वप्न आहे, अशी माहिती नवरगाव येथील भारत विद्यालयाची अंतरा हेडाऊ हिने दिली.
नापासामध्ये मुलांचे प्रमाण अधिक
- दरवर्षीप्रमाणे यावर्षीही मुलींचीच कामगिरी सरस ठरली. मुलांच्या निकालाची टक्केवारी २२.५१, तर मुलांची ८४.७३ टक्के आहे.
- परीक्षा दिलेल्या १४ हजार १६१ मुलांपैकी १२ हजार तब्बल ३ हजार १३५ मुले नापास झाले. नापास होण्याचे प्रमाण मुलांमध्येच अधिक आहे.
स्नेहलला मिळवायचा नॅशनल कॉलेजमध्ये प्रवेश
शिक्षक व कुटुंबाकडून उत्तम मार्गदर्शन मिळाले. पुढे आयएटी ही प्रवेश देऊन भारतातील सातपैकी एका राष्ट्रीय आयझर कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायचा आहे. फॉरेन्सिक अभ्यासोबतच जेईई व नीटची तयारी करणार, या शब्दात शिवाजी विद्यालयाची स्नेहल रामगिरवार हिने आनंद व्यक्त केला. स्टेट बोर्डाच्या परीक्षेत स्नेहलला सर्वाधिक ९८.४० टक्के मिळाल्याने संस्थेच्या वतीने तिचा सत्कार करण्यात आला.