लग्नाच्या दीड माहिन्यापूर्वीच राेखपाल तरुणाची आत्महत्या, कारण अस्पष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2022 12:25 IST2022-04-05T12:22:38+5:302022-04-05T12:25:33+5:30

कपिल हा गोंडपिपरी येथे महिंद्रा होम फायनान्स कंपनीमध्ये रोखपाल पदावर कार्यरत होता. नुकतेच त्याचे लग्न जुळले असून, १५ मे रोजी त्याचा लग्नसोहळा आयोजित केला होता.

cashier committed suicide in his office in gondpipri | लग्नाच्या दीड माहिन्यापूर्वीच राेखपाल तरुणाची आत्महत्या, कारण अस्पष्ट

लग्नाच्या दीड माहिन्यापूर्वीच राेखपाल तरुणाची आत्महत्या, कारण अस्पष्ट

ठळक मुद्देगोंडपिपरीतील घटना

गोंडपिपरी (चंद्रपूर) : दीड महिन्यावर लग्न असतानाच तरुणाने गळफास लावून आत्महत्या केली. विशेष म्हणजे, ज्या ठिकाणी ताे राेखपाल म्हणून ड्युटीवर हाेता, त्या महिंद्रा होम फायनान्स कंपनीच्या कार्यालयातच त्याने गळफास घेतला. ही घटना रविवारी उघडकीस आली.

कपिल वराते (२८, रा.चेकदरूर, ता.गोंडपिपरी) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. कपिल हा गोंडपिपरी येथे महिंद्रा होम फायनान्स कंपनीमध्ये रोखपाल पदावर कार्यरत होता. नुकतेच त्याचे लग्न जुळले असून, १५ मे रोजी त्याचा लग्नसोहळा आयोजित केला होता. रविवारी तो एका लग्नसोहळ्यासाठी वरोरा येथे गेला होता. तेथून परत आल्यानंतर कार्यालयाला सुट्टी असतानाही त्याने महिंद्रा होम फायनान्स कंपनीचे कार्यालय गाठले. तेथेच गळफास घेत आत्महत्या केली.

घटनेची माहिती ठाणेदार जीवन राजगुरू यांना मिळताच, त्यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. पोलिसांनी वराते याचा मोबाइल जप्त केला आहे. आत्महत्येचे कारण अद्याप कळले नसून, पुढील तपास गोंडपिपरी पोलीस करीत आहेत.

Web Title: cashier committed suicide in his office in gondpipri