न्यायालयाच्या प्रवेशद्वारावर आढळला तरुणीचा मृतदेह, आत्महत्या की घातपात? पोलिसांचा तपास सुरु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2022 14:04 IST2022-12-06T14:00:09+5:302022-12-06T14:04:28+5:30
ब्रह्मपुरी येथील घटना, एकच खळबळ

न्यायालयाच्या प्रवेशद्वारावर आढळला तरुणीचा मृतदेह, आत्महत्या की घातपात? पोलिसांचा तपास सुरु
चंद्रपूर : ब्रह्मपुरी येथील न्यायालयाच्या प्रवेश द्वारावर एका तरुणीचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. ही घटना आज (दि. ६) पहाटे उघडकीस आली असून हत्या की आत्महत्या याबाबत चर्चांना पेव फुटले आहे.
मृत तरुणी ही गडचिरोली जिल्ह्यातील रहिवासी असल्याचे सांगितले जात आहे. दिवाणी न्यायालयाच्या इमारतीच्या गेटवर गळफास घेतलेल्या अवस्थेत तिचा मृतदेह आढळून आला आहे. ती ब्रम्हपुरीत कशी आली? तिचा मृत्यू नेमका कशाने झाला, असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. ब्रम्हपुरी पोलीस सध्या या घटनेचा तपास करत आहेत.