चंद्रपूर जिल्हा परिषदेवर भाजपाचेच वर्चस्व, संध्या गुरनुले नवीन अध्यक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2020 14:30 IST2020-01-04T14:30:28+5:302020-01-04T14:30:45+5:30

नव्या अध्यक्षा भाजपच्या संध्या गुरनुले तर उपाध्यक्ष रेखा कारेकर विजयी

BJP dominates Chandrapur Zilla Parishad, Sandhya Gurunule new president | चंद्रपूर जिल्हा परिषदेवर भाजपाचेच वर्चस्व, संध्या गुरनुले नवीन अध्यक्ष

चंद्रपूर जिल्हा परिषदेवर भाजपाचेच वर्चस्व, संध्या गुरनुले नवीन अध्यक्ष

चंद्रपूर : जिल्हा परिषदेवर पुन्हा भाजपाचाच झेंडा. संध्या गुरनुले यांची अध्यक्षपदी निवड झाली असून रेखा कारेकर यांची उपाध्यक्षपदी वर्णी लागली आहे. भाजप नेते माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी त्यांच्या अधिपत्याखालील हा गड राखला आहे. गुरनुले व कारेकर यांना प्रत्येकी 36 मते मिळाली. 

काँग्रेसच्या अध्यक्ष पदाच्या उमेदवार वैशाली शेरकी व उपाध्यक्ष पदाचे उमेदवार खेमराज मरस्कोल्हे यांना प्रत्येकी 20 मते मिळाली. काँग्रेसचे सतिश वारजूकर व स्मिता पारधी यांनी नामांकन परत घेतले होते.

Web Title: BJP dominates Chandrapur Zilla Parishad, Sandhya Gurunule new president