An angry father killed a drunken boy, even present himself in the police in chandrapur | संतप्त पित्याने दारुड्या मुलाला ठार मारले, पोलिसातही स्वत:हून हजर
संतप्त पित्याने दारुड्या मुलाला ठार मारले, पोलिसातही स्वत:हून हजर

 चंद्रपूर : मुलाच्या सतत होणाऱ्या त्रासाला कंटाळून जन्मदात्या पित्यानेच मुलाच्या डोक्यात हातोडीचा घाव घालून जागीच ठार केले. बल्लारपूर येथील विद्यानगर वॉर्डात ही थरारक घटना सकाळी घडली. राहुल सोपान नगराळे (42) असे मृतकाचे तर सोपान नगराळे (74) असे आरोपी पित्याचे नाव असल्याची माहिती बल्लारपूर पोलिसांनी दिली. 

मुलगा राहुल याला दारूचे व्यसन होते. मद्यधुंद अवस्थेत तो कुटुंबातील लोकांना कमालीचा त्रास देत होता. स्वतःच्या लहान मुलीसह आईवडील यांनाही त्रास देत होता. त्यामुळे विवंचनेत वडील सोपान नगराळे यांनी सकाळी झोपेत असलेल्या राहुलच्या डोक्यावर हातोडीने घाव घालून जागीच ठार केले. त्यानंतर घराबाहेर निघून मुलाची हत्या केल्याचे शेजारच्या लोकांना सांगितले. तसेच एका पिशवीत कपडे घेऊन बल्लारपूर पोलीस ठाण्यात जाऊन सोपान यांनी मुलाची हत्या केल्याची माहिती पोलिसांना दिली. पुढील तपास सुरू आहे.

Web Title: An angry father killed a drunken boy, even present himself in the police in chandrapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.