मित्राच्या बंगल्याला पुरापासून वाचविण्यासाठी शासकीय निधीतून बांधली सुरक्षा भिंत?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2025 13:18 IST2025-07-03T13:17:44+5:302025-07-03T13:18:40+5:30
Chandrapur : जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी दिले सभागृहात उत्तर

A security wall built with government funds to protect a friend's bungalow from flooding?
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : नियमाला बगल देऊन शासकीय निधीतून बांधलेल्या चंद्रपुरातील एका वादग्रस्त सुरक्षा भितींचा प्रश्न भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मागील अधिवेशनात तारांकित प्रश्नाद्वारे मांडला होता. बुधवारी (दि. २) पावसाळी अधिवेशनातही त्यांनी याच मुद्याकडे सभागृहाचे पुन्हा लक्ष वेधले. दरम्यान, आमदार विजय वडेट्टीवार यांनीही त्यांना पाठिंबा दर्शविला अन् आमदार किशोर जोरगेवार यांनी मत मांडले. तीनही 'वारां'च्या या प्रश्नावरून राज्याचे जलसंधारणमंत्री संजय राठोड यांनी उत्तर दिल्याने अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी चंद्रपूरची भिंत चांगलीच गाजल्याचे सभागृहात दिसून आले.
चंद्रपुरातील एका मित्राच्या बंगल्याला पुरापासून वाचविण्यासाठी शासकीय निधीतून सुरक्षा भिंत बांधल्याचा मुद्दा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी काही महिन्यांपूर्वी तारांकित प्रश्नाद्वारे मांडला होता. बांधकाम करणाऱ्यावर कारवाई करणार काय, असा त्यांनी सवाल उपस्थित केला. त्यानंतर आमदार जोरगेवार यांनी खुलासेवजा मत मांडून काही प्रश्न विचारले. तीनही 'वारां'च्या या प्रश्नावरून जलसंधारणमंत्री राठोड यांनी पुन्हा उत्तर दिले. त्यामुळे अधिवेशनात चंद्रपूरची वादग्रस्त भिंत चांगलीच गाजल्याचे सभागृहात दिसून आले.
आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी उपस्थित केला प्रश्न
- बुधवारी (दि. २) पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीदेखील आमदार मुनगंटीवार यांनी या वादग्रस्त सुरक्षा भितींचा प्रश्न उपस्थित केला.
- पूर संरक्षणासाठी चुकीच्या पद्धतीने सुरक्षा भिंत बांधणाऱ्या अधिकाऱ्याला निलंबित करणार काय, त्या नाल्याची वस्तुस्थिती काय, नाल्याचा नैसर्गिक प्रवाह बिघडल्याने ते योग्य पद्धतीने बांधणार काय, यासाठी मनपाची एनओसी घेणार काय, इत्यादी प्रश्न सभागृहात मांडले. त्यावर राज्याचे जलसंधारणमंत्री संजय राठोड यांनी उत्तर दिले.
- मात्र, त्यावर समाधान न झाल्याने आमदार विजय वडेट्टीवार यांनी या प्रश्नात उडी टाकली. एका व्यक्तीच्या बंगल्याला संरक्षण देण्यासाठी चुकीचे बांधकाम केले.