Video: शेतकऱ्याच्या रानात 24 किलोचा महाकाय अजगर, झेडपी सदस्याने घेतली धाव
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2022 15:27 IST2022-12-07T15:26:13+5:302022-12-07T15:27:21+5:30
झेप संस्थेच अध्यक्ष डॉ . पवन नागरे यांनी त्वरित घटनास्थळी जाऊन अजगराला पकडले.

Video: शेतकऱ्याच्या रानात 24 किलोचा महाकाय अजगर, झेडपी सदस्याने घेतली धाव
चंद्रपूर - साप, नाग यासंह सरपटणारे प्राणी शेतात किंवा डोंगरभागात दिसून येणं ही नवी गोष्ट नाही. मात्र, अजगर आढळून आल्यास सर्वत्र याची चर्चा होते. चंद्रपूर जिल्ह्याच्या नागभीड-ब्रम्हपुरी मार्गावरील कोर्धा गावानजीक शैलेश जीवतोडे यांच्या शेतात भलं मोठं अजगर आढळल्याने खळबळ उडाली होती. जिल्हा परिषदचे माजी सदस्य संजय गजपुरे यांना याबाबत माहिती कळताच तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर, त्यांनी झेप संस्थेच्या सर्पमित्रांना ही माहिती दिली.
झेप संस्थेच अध्यक्ष डॉ . पवन नागरे यांनी त्वरित घटनास्थळी जाऊन अजगराला पकडले. तोपर्यंत येथे बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. झेप संस्थेच्या सर्पमित्रांनी त्या अजगरला सुखरूप पकडून नागभीड वनविभाग कार्यालयात आणले. या अजगराची लांबी १२ फूट असून वजन २४ किलो आहे. अजगराची माहिती मिळताच नागभीडच्या विविध शाळांतील विद्यार्थी पुस्तकात ज्यांच्याविषयी शिकतो ते अजगर प्रत्यक्षात कसे दिसते हे पाहण्यासाठी शिक्षकांसह वन विभागाच्या कार्यालयात आले होते .त्यानंतर अजगराला घोडाझरी जंगलात सोडण्यात आले. दरम्यान, ग्रामस्थांनीही अजगर पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती.
चंद्रपूर - शेतकऱ्याच्या रानात महाकाय अजगर, झेडपी सदस्याने घेतली धाव pic.twitter.com/I41DGqXziB
— Lokmat (@lokmat) December 7, 2022