विधानसभा निवडणुकीसाठी २३७ बसेस आरक्षित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2019 06:00 IST2019-10-14T06:00:00+5:302019-10-14T06:00:34+5:30
विधानसभा निवडणूक प्रक्रियेसाठी जिल्हा प्रशासनाचे १० हजारांहून अधिक कर्मचारी रात्रंदिवस काम करत आहेत. जिल्ह्यातील बल्लारपूर, राजुरा, वरोरा, ब्रह्मपुरी, चिमूर आणि चंद्रपूर तालुक्यात दळणवळण सुविधांचा अभाव असलेल्या ग्रामीण भागात वाहतुकीसाठी एसटी हा उत्तम पर्याय आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी २३७ बसेस आरक्षित
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : २१ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकीसाठी जिल्हा निवडणूक प्रशासनाने २३७ बसेस आरक्षिण केल्या आहेत. यामुळे एसटी महामंडळाला कोटींचे उत्पन्न मिळणार आहे.
विधानसभा निवडणूक प्रक्रियेसाठी जिल्हा प्रशासनाचे १० हजारांहून अधिक कर्मचारी रात्रंदिवस काम करत आहेत. जिल्ह्यातील बल्लारपूर, राजुरा, वरोरा, ब्रह्मपुरी, चिमूर आणि चंद्रपूर तालुक्यात दळणवळण सुविधांचा अभाव असलेल्या ग्रामीण भागात वाहतुकीसाठी एसटी हा उत्तम पर्याय आहे. मतदान केंद्रावरील नियुक्त कर्मचारी आणि प्रशासकीय साहित्याच्या वाहतुकीसाठी जिल्हा निवडणूक प्रशासनाने २३७ बसेसची मागणी एसटी महामंडळाकडे नोंदवली आहे. कर्मचाऱ्यांना प्रवासादरम्यान अडचणी येऊ नये, याकरिता काही दिवसांत अतिरिक्त बसेसचीही मागणी केल्या जाऊ शकते.
मतदानाच्या एक दिवस आधी म्हणजे २० ऑक्टोबर आणि मतदानाच्या दिवशी २१ ऑक्टोबर २०१९ रोजी असे दोन दिवस एसटी महामंडळाकडून जिल्हा निवडणूक प्रशासनाला सेवा पुरविण्यात येणार आहे. मतदान केंद्रावर मतदार यंत्र पोहचविणे आणि मतमोजणीच्या ठिकाणी नेण्यासाठी एसटीचा वापर केला जाणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या कामासाठी प्रति किलोमीटर ५१ रूपये हा दर निश्चित करण्यात आला आहे. खासगी वाहनाच्या तुलनेत एसटीचे दर कमी आहेत. त्यामुळे निवडणुकीच्या कामासाठी शासनाने एसटीला प्रथम प्राधान्य दिले. या निर्णयामुळे एसटी महामंडळाचे उत्पन्नही वाढणार आहे. सहा महिन्यांपूर्वी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत एसटी महामंडळाला आर्थिक फायदा झाला होता. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघासाठी शेकडो बसेस आरक्षित करण्यात आल्या होत्या. त्या माध्यमातून एसटी महामंडळाला सुमारे कोटी रूपयांचे उत्पन्न मिळाले होते. परंतु, ही रक्क्कम अद्याप मिळाली नसल्याचे समजते.
व्हीटीएस प्रणालीमुळे प्राधान्य
चंद्रपूर विभागात एसटी महामंडळात शिवशाही, निमआराम, साधी लालपरी व शहरी बसेसचा समावेश आहे. जिल्हा निवडणूक प्रशासनाच्या मागणीनुसार एसटी महामंडळ बसेस उपलब्ध करून देणार आहे. बहुतांश बसेसला व्हीटीएस अर्थात व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टीम बसविण्यात आले. त्यामुळे निवडणूक विभागाने एसटीला प्राधान्य दिले आहे.सर्वांचे
जिल्हा निवडणूक प्रशासनान केलेल्या मागणीनुसार बसेस आरक्षित करण्यात आल्या आहेत. या सर्व बसेसमध्ये उत्तम सुविधा आहेत. प्रवाशांना नियमित सेवा देत असताना प्रशासनाकडून मागणी वाढली तरी बसेस पुरवण्याचे नियोजन तयार करण्यात आले.
- आर. एन. पाटील, विभागीय नियंत्रक, चंद्रपूर