आनंदवनात तब्बल २२७ कोरोनाबाधित

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2021 05:50 IST2021-03-10T05:49:41+5:302021-03-10T05:50:03+5:30

 आनंदवनात कोरोनाने दोघांचा बळीदेखील घेतला आहे.

227 corona in Anandvan | आनंदवनात तब्बल २२७ कोरोनाबाधित

आनंदवनात तब्बल २२७ कोरोनाबाधित

लोकमत न्यूज नेटवर्क
वरोरा (जि. चंद्रपूर) : ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांची कर्मभूमी असलेल्या आनंदवनात अचानक कोरोनाचा उद्रेक झाला असून तब्बल २२७ रुग्ण आढळल्याने तेथे लॉकडाऊन करण्यात आला आहे. 

आनंदवनात कोरोनाने दोघांचा बळीदेखील घेतला आहे. त्यामुळे येथून कुणालाही बाहेर पडू दिले जात नाही तसेच बाहेरच्यांना आत प्रवेश नाही. येथील रुग्णांवर आनंदवनातच उपचार केले जात आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड यांनी दिली.
 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आनंदवनातच राहणारे आहेत. १,२०० व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात आली. 

Web Title: 227 corona in Anandvan