जिल्ह्यातील ११ ग्रामपंचायतींना आता नव्या इमारती; निधी उपलब्ध, काम झाले सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2025 13:22 IST2025-01-29T13:21:03+5:302025-01-29T13:22:23+5:30

ग्राम स्वराज्य योजनेतून निधी : काम प्रगतिपथावर

11 Gram Panchayats in the district now have new buildings; Funds available, work has begun | जिल्ह्यातील ११ ग्रामपंचायतींना आता नव्या इमारती; निधी उपलब्ध, काम झाले सुरू

11 Gram Panchayats in the district now have new buildings; Funds available, work has begun

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर :
राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियानांतर्गत जिल्ह्यातील ११ ग्रामपंचायतींसाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या ग्रामपंचायतींच्या बांधकामाला प्रशासकीय मान्यता मिळाली असून कामही सुरू करण्यात आले आहे.


गावांचा विकास झाल्याशिवाय देशाचा विकास होणार नाही, ही बाब लक्षात घेऊन शासनाने विविध योजनांची अंमलबजावणी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सुरू केली आहे. गावाच्या विकासात ग्रामपंचायतींचे विशेष महत्त्व आहे. मात्र, काही ग्रामपंचायतींचा कारभार आजही कौलारू इमारतीतून चालवला जात होता. काळाच्या ओघात काही इमारती जुन्या झाल्या. पावसाचे पाणी गळण्यास सुरुवात झाली. पावसाच्या पाण्यामुळे ग्रामपंचायतींमधील गावकऱ्यांचे महत्त्वाचे दस्तऐवज नष्ट होण्याचा धोका निर्माण झाला होता. त्यामुळे या ग्रामपंचायतींच्या इमारतींसाठी शासनाने निधी उपलब्ध करून दिला आहे. इमारतींच्या बांधकामाला सुरुवात झाली आहे. काही इमारतींचे काम प्रगतिपथावर आहे. जिल्ह्यातील काही मोजक्या ग्रामपंचायती सोडल्या तर जवळपास सर्वच ग्रामपंचायतींच्या इमारती आता पक्क्या झाल्या आहेत. नागरिकांचे दस्तऐवज आता ग्रामपंचायतीत सुरक्षित राहणार आहेत. 


अशी राहणार इमारत...
नवीन इमारतीमध्ये ग्रामपंचायत अधिकाऱ्यांसाठी स्वतंत्र कक्ष निर्माण करण्यात येणार आहे. स्वच्छतागृह, स्वत्रंत पाणीसुविधा, सरपंचासाठी कक्ष राहणार आहे.


कामात येणार गती
नवीन इमारतींमुळे प्रशासकीय कामाला गती देण्यास मदत होणार आहे. गावातील नागरिकांच्या दस्तऐवजाचे संरक्षणसुद्धा होणार आहे.


दुर्गम भागातील ग्रामपंचायतींकडे अधिक लक्ष

  • जिल्ह्यातील दुर्गम भागातील अनेक गावांमध्ये ग्रामपंचायतीचे कार्यालय नव्हते. अशा गावामध्ये आता चकाचक ग्रामपंचायत इमारत बघायला मिळणार आहे.
  • जिल्ह्यात विसापूर, दुर्गापूर, 3 ऊर्जानगर आदी ग्रामपंचायती मोठ्या असून, कारभार सुसज्ज इमारतीतून चालविता जातो. दरम्यान, आजही काही ठिकाणच्या ग्रामपंचायतीच्या इमारती जीर्ण झाल्या आहे.


नवीन इमारती प्रशस्त
नवीन इमारती आधुनिक पद्धतीने बांधल्या जात आहेत. त्यामुळे त्या मजबूत असण्याबरोबरच त्यात अनेक सुविधा उपलब्ध राहणार आहेत. प्रशस्त असल्याने नागरिकांसाठी सोयीचे होणार आहे.


या ठिकाणी नवीन इमारती
ज्या गावामध्ये ग्रामपंचायतीची इमारत नव्हती, भाड्याच्या इमारतीतून कारभार चालविला जात होता, अशा गावांत नव्याने इमारत बांधकाम केले जाणार आहे. विशेषतः काही ठिकाणच्या ग्रामपंचायतीचे कार्यालय जीर्ण झाले होते. त्यामुळे आता नव्या इमारतीतून कारभार चालविला जाणार आहे.


२० लाख सरपंच, सचिवांनी स्वतंत्र कक्ष राहणार
रुपयांचा निधी प्रत्येक ग्रामपंचायतीला इमारत बांधकामासाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्याअंतर्गत काम सुरू आहे.

Web Title: 11 Gram Panchayats in the district now have new buildings; Funds available, work has begun

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.