lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > Anand Mahindra : ’१० मिनिटांत डिलिव्हरी’वर आनंद महिंद्रांचा प्रश्न; Zepto च्या संस्थापकानं दिलं हे उत्तर

Anand Mahindra : ’१० मिनिटांत डिलिव्हरी’वर आनंद महिंद्रांचा प्रश्न; Zepto च्या संस्थापकानं दिलं हे उत्तर

Anand Mahindra : आनंद महिंद्रा यांनी काही दिवसांपूर्वी आपल्या ट्विटर हँडलवर १० मिनिटांत ग्रोसरी डिलिव्हरीला ‘अमानवीय’ म्हणणाऱ्या एका पोस्टचं समर्थन केलं होतं.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2022 02:32 PM2022-04-19T14:32:56+5:302022-04-19T14:35:55+5:30

Anand Mahindra : आनंद महिंद्रा यांनी काही दिवसांपूर्वी आपल्या ट्विटर हँडलवर १० मिनिटांत ग्रोसरी डिलिव्हरीला ‘अमानवीय’ म्हणणाऱ्या एका पोस्टचं समर्थन केलं होतं.

zepto founder ceo aadit palicha respond mahindra and mahindra anand mahindra tweet about 10 minute grocery delivery twitter | Anand Mahindra : ’१० मिनिटांत डिलिव्हरी’वर आनंद महिंद्रांचा प्रश्न; Zepto च्या संस्थापकानं दिलं हे उत्तर

Anand Mahindra : ’१० मिनिटांत डिलिव्हरी’वर आनंद महिंद्रांचा प्रश्न; Zepto च्या संस्थापकानं दिलं हे उत्तर

Anand Mahindra : महिंद्रा अँड महिंद्राचे (Mahindra And Mahindra) प्रमुख आनंद महिंद्रा (Anand Mahindra) हे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात अॅक्टिव्ह असतात. याशिवाय ते अनेकदा सोशल मीडियाद्वारे आपलं मत किंवा माहितीही शेअर करत असतात. त्यांच्या पोस्टना नेटकऱ्यांकडूनही मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असतो. आनंद महिंद्रा यांनी काही दिवसांपूर्वी आपल्या ट्विटर हँडलवर १० मिनिटांत ग्रोसरी डिलिव्हरीला ‘अमानवीय’ म्हणणाऱ्या एका पोस्टचं समर्थन केलं होतं. परंतु आता झेप्टोचे (Zepto) संस्थापक आदित पलिचा (Aadit Palicha) यांनी त्यांना यासंदर्भात योग्य माहिती दिली आहे.

आनंद महिंद्रा यांनी काही दिवसांपूर्वी ट्विटरवर टाटा मेमोरिअलचे (TATA Memorial) डायरेक्टर प्रमेश यांचं ट्वीट रिट्वीट केलं होतं. त्यांच्या ट्वीटवर आनंद महिंद्रा यांना सहमती दर्शवली होती. “मला या ट्वीटनंतर किती ट्रोल केलं जाईल याची मला काळजी नाही. परंतु १० मिनिटांमध्ये किराणा सामानाची डिलिव्हरी करणं त्या व्यक्तीसोबत अमानवीय आहे. याला बंद करा. ग्राहक २ तास काय ६ तासांच्या डिलिव्हरी टाईमसोबतही जीवंत राहू शकतात,” असं प्रमेश यांनी म्हटलं होतं. तसंच त्यांनी या ट्वीटला स्विगी आणि उबर इट्सलाही टॅग केलं होतं.



झेप्टोच्या सीईओंचं उत्तर
झेप्टोचे प्रमुख आदित पलिचा यांनी आनंद महिंद्रा यांना १० मिनिटांत डिलिव्हरीच्या मागील कॉन्सेप्ट समजावला. “१० मिनिटांची डिलिव्हरी ही कमी अंतरासाठी आहे, ना की जलद गाडी चालवण्यासाठी. झेप्टोच्या एका डिलिव्हरीसाठी सरासरी अंतर हे १.८ किलोमीटर आहे. १० मिनिटांमध्ये १.८ किलोमीटरचं अंतर कापण्यासाठी एका डिलिव्हरी बॉयला १५ किमी प्रति तासाच्या वेगानं गाडी चालवावी लागेल. कदाचित हेच कारण आहे की झेप्टोच्या ड्रायव्हरदरम्यान अपघाताचा दर सामान्य बाईक चालकांच्या तुलनेत ३.१ टक्क्यांनी कमी आहे,” असं आदित म्हणाले. यावर आनंद महिंद्रा यांनी रिप्लाय देत दुसऱ्या बाजूचा दृष्टीकोनही ऐकून घेणं योग्य असल्याचं म्हटलं.

Web Title: zepto founder ceo aadit palicha respond mahindra and mahindra anand mahindra tweet about 10 minute grocery delivery twitter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.