Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money >शेअर बाजार > काही मिनिटांत झोमॅटोच्या दीपिंदर गोयल यांचे बुडाले ५५६ कोटी रुपये; छोट्या गुंतवणूकदारांनीही हात वर केले, कारण काय?

काही मिनिटांत झोमॅटोच्या दीपिंदर गोयल यांचे बुडाले ५५६ कोटी रुपये; छोट्या गुंतवणूकदारांनीही हात वर केले, कारण काय?

Zomato CEO Deepinder Goyal: झोमॅटोला ऑपरेट करणाऱ्या 'इटर्नल' कंपनीचे संस्थापक आणि सीईओ दीपिंदर गोयल यांना मोठं नुकसान झालं आहे. पाहा काय आहे यामागचं कारण.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2025 15:29 IST2025-10-17T15:29:53+5:302025-10-17T15:29:53+5:30

Zomato CEO Deepinder Goyal: झोमॅटोला ऑपरेट करणाऱ्या 'इटर्नल' कंपनीचे संस्थापक आणि सीईओ दीपिंदर गोयल यांना मोठं नुकसान झालं आहे. पाहा काय आहे यामागचं कारण.

Zomato s Deepinder Goyal lost Rs 556 crore in a few minutes know why stocks down | काही मिनिटांत झोमॅटोच्या दीपिंदर गोयल यांचे बुडाले ५५६ कोटी रुपये; छोट्या गुंतवणूकदारांनीही हात वर केले, कारण काय?

काही मिनिटांत झोमॅटोच्या दीपिंदर गोयल यांचे बुडाले ५५६ कोटी रुपये; छोट्या गुंतवणूकदारांनीही हात वर केले, कारण काय?

Zomato CEO Deepinder Goyal: झोमॅटोला (Zomato) ऑपरेट करणाऱ्या 'इटर्नल' (Eternal) कंपनीचे संस्थापक आणि सीईओ दीपिंदर गोयल (Deepinder Goyal) यांना मोठं नुकसान झालं आहे. शुक्रवारच्या शेअर बाजारातील कामगिरीमुळे त्यांना मिनिटांत ५५६ कोटी रुपये गमवावे लागले. शुक्रवारचा दिवस 'इटर्नल'साठी चांगला ठरला नाही. कंपनीचे शेअर्स ४.२ टक्क्यांपर्यंत आपटले, ज्यामुळे स्टॉक घसरून ३३३.७५ रुपयांच्या इंट्रा-डे लो पातळीवर आला. 'इटर्नल'मध्ये दीपिंदर गोयल यांचा एकूण हिस्सा ३.८३ टक्के आहे. त्यांच्याकडे ३६,९४,७१,५०० शेअर्स आहेत.

बीएसईमध्ये (BSE) आज शुक्रवारी 'इटर्नल'चे शेअर्स ३४०.३० रुपयांवर उघडले होते. कंपनीचे शेअर्स एका क्षणी ३४७.७५ रुपयांच्या इंट्रा-डे उच्चांकावरही पोहोचले. परंतु विक्रीच्या दबावामुळे हा स्टॉक ३३३.७५ रुपयांच्या इंट्रा-डे लो पातळीपर्यंत खाली आला.

२४ सोडा आता १८ कॅरेट सोनंही १ लाखांच्या पार, सोन्याच्या चांदीच्या दरांना लागले पंख; एका दिवसात ३ हजारांची वाढ

मिनिटांत मोठं नुकसान

'इटर्नल'च्या शेअर्समध्ये झालेल्या घसरणीमुळे दीपिंदर गोयल यांच्या शेअर्सचं मूल्य कमी होऊन १२३३१.११ कोटी रुपये झालं. शेअर्समध्ये घसरण होण्यापूर्वी त्यांच्या शेअर्सचे मूल्यांकन १२,८८७.१६ कोटी रुपये होतं. आकडेवारीनुसार, दीपिंदर गोयल यांना एकूण ५५६.०५ कोटी रुपयांचे नुकसान झालंय.

तिमाही निकालामुळे शेअर आपटला

दीपेंद्र गोयल यांच्यासह कोट्यवधी गुंतवणूकदारांना तिमाही निकालांमुळे धक्का बसला आहे. 'इटर्नल'चा निव्वळ नफा (Net Profit) वार्षिक आधारावर ६३ टक्क्यांनी कमी झालाय. जुलै ते सप्टेंबर २०२५ दरम्यान 'इटर्नल'चा निव्वळ नफा ६५ कोटी रुपये होता. कंपनीच्या महसुलात १८३ टक्क्यांची वाढ झाली आहे. यावेळेस दुसऱ्या तिमाहीत 'इटर्नल'चा महसूल १३५९० कोटी रुपये राहिला आहे. 'इटर्नल'चा ईबीआयटीडीए (EBITDA) वार्षिक आधारावर ३२ टक्क्यांनी घसरला आहे. तो दुसऱ्या तिमाहीत २२४ कोटी रुपये राहिलाय.

तज्ज्ञांचं मत काय?

'बिझनेस टुडे'च्या रिपोर्टनुसार, 'इटर्नल'च्या शेअर्सच्या कामगिरीबद्दल तज्ज्ञांची मतं वेगवेगळी आहेत. काही तज्ज्ञांचं मत आहे की कंपनीचे शेअर्स चांगली कामगिरी करतील, तर काहींना त्यात विक्री होण्याची अपेक्षा आहे.

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title : Zomato के दीपिंदर गोयल को भारी नुकसान, तिमाही नतीजों से शेयर गिरा

Web Summary : Zomato के सीईओ दीपिंदर गोयल को तिमाही नतीजों के बाद शेयरों में 4.2% की गिरावट से भारी नुकसान हुआ। शुद्ध लाभ 63% गिरा, जिससे निवेशकों का विश्वास कम हुआ। विशेषज्ञों की राय अलग-अलग है, निवेश से पहले सावधानी बरतने की सलाह दी जाती है।

Web Title : Zomato's Deepinder Goyal Loses Millions: Stock Plummets After Profit Dip

Web Summary : Zomato CEO Deepinder Goyal lost millions as shares fell 4.2% after disappointing quarterly results. Net profit dropped 63%, impacting investor confidence. Experts have mixed opinions on the stock's future, advising caution before investing.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.