Lokmat Money >शेअर बाजार > १ फेब्रुवारी २०२५ ला बजेटच्या दिवशी आहे शनिवार; BSE-NSE वर ट्रेडिंग करता येणार का?

१ फेब्रुवारी २०२५ ला बजेटच्या दिवशी आहे शनिवार; BSE-NSE वर ट्रेडिंग करता येणार का?

Union Budget 1st February: दरवर्षी १ फेब्रुवारीला केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला जातो. वर्ष २०२५ मध्ये १ फेब्रुवारी हा शनिवार आहे. जाणून घ्या या दिवशी ट्रेडिंग होणार की नाही.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2024 12:56 IST2024-12-24T12:56:48+5:302024-12-24T12:56:48+5:30

Union Budget 1st February: दरवर्षी १ फेब्रुवारीला केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला जातो. वर्ष २०२५ मध्ये १ फेब्रुवारी हा शनिवार आहे. जाणून घ्या या दिवशी ट्रेडिंग होणार की नाही.

union Budget Day February 1 2025 Saturday you can trade on BSE NSE finance minister nirmala sitharaman | १ फेब्रुवारी २०२५ ला बजेटच्या दिवशी आहे शनिवार; BSE-NSE वर ट्रेडिंग करता येणार का?

१ फेब्रुवारी २०२५ ला बजेटच्या दिवशी आहे शनिवार; BSE-NSE वर ट्रेडिंग करता येणार का?

Union Budget 1st February: दरवर्षी १ फेब्रुवारीला केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला जातो. वर्ष २०२५ मध्ये १ फेब्रुवारी हा शनिवार आहे. सर्वसाधारणपणे शनिवार आणि रविवारी शेअर बाजार बंद असतो आणि ट्रेडिंग होत नाही. पण यावर्षी शनिवारीही देशांतर्गत शेअर बाजार, नॅशनल स्टॉक एक्स्चेंज (NSE) आणि बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज (BSE) या प्रमुख एक्स्चेंजमध्ये व्यवहार होणार आहेत. लाइव्हमिंटच्या वृत्तानुसार, गुंतवणूकदारांना लाइव्ह ट्रेडिंग करता येणार आहे. दोन्ही एक्स्चेंज नेहमीप्रमाणे सकाळी ९.१५ ते दुपारी ३.३० वाजेपर्यंत सामान्य कामकाजासाठी खुले राहतील.

अर्थसंकल्पात यावर सरकार भर देणार!

वृत्तानुसार, अर्थमंत्री निर्मला सीतारामन २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकांनंतर आपला दुसरा सर्वसमावेशक अर्थसंकल्प सादर करणार आहेत. अमृत काळातील भारताला विकसित भारतात रूपांतरित करण्यात मदत करण्याच्या चालू असलेल्या विषयावर अर्थसंकल्पीय प्रस्तावांमध्ये लक्ष केंद्रित केलं जाण्याची शक्यता आहे. अर्थसंकल्पात भांडवली खर्च आणि राजकोषीय मुद्द्यांवर भर दिला जाईल, अशी तज्ज्ञांची अपेक्षा आहे. अलीकडच्या तिमाहीत भारतीय अर्थव्यवस्थेनं दाखविलेली कमकुवतपणाची चिन्हं लक्षात घेता सीतारामन पायाभूत सुविधा, उत्पादन आणि बांधकाम यासारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतील, असं मानलं जात आहे.

शेअर बाजाराला सुट्टी कधी?

बीएसई आणि एनएसईनं २०२५ मधील शेअर बाजाराच्या सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे. पहिली सुट्टी २६ फेब्रुवारी २०२५ रोजी महाशिवरात्रीच्या निमित्तानं असेल. शेअर बाजाराच्या सुट्टीच्या कॅलेंडरनुसार बीएसई आणि एनएसईवरील व्यवहार बंद राहतील. २०२५ मध्ये एकूण १४ दिवसांसाठी कामकाज बंद राहणार आहे.

Web Title: union Budget Day February 1 2025 Saturday you can trade on BSE NSE finance minister nirmala sitharaman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.