Lokmat Money >शेअर बाजार > रिलायन्स ते टाटा.. शेअर बाजारातील तडाख्यात देशातील टॉप ८ कंपन्या भुईसपाट; फक्त 'या' २ वाचल्या

रिलायन्स ते टाटा.. शेअर बाजारातील तडाख्यात देशातील टॉप ८ कंपन्या भुईसपाट; फक्त 'या' २ वाचल्या

Share Market Crashe :गेल्या आठवड्यात भारतीय शेअर बाजारात पुन्हा एकदा मोठी घसरण पाहायला मिळाली. यातून देशातील टॉप कंपन्याही सुटल्या नाहीत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2025 15:50 IST2025-03-02T15:49:55+5:302025-03-02T15:50:26+5:30

Share Market Crashe :गेल्या आठवड्यात भारतीय शेअर बाजारात पुन्हा एकदा मोठी घसरण पाहायला मिळाली. यातून देशातील टॉप कंपन्याही सुटल्या नाहीत.

top 10 companies valuation decline by 3 lakh crore last week tcs biggest decline hdfc bank and bajaja increase | रिलायन्स ते टाटा.. शेअर बाजारातील तडाख्यात देशातील टॉप ८ कंपन्या भुईसपाट; फक्त 'या' २ वाचल्या

रिलायन्स ते टाटा.. शेअर बाजारातील तडाख्यात देशातील टॉप ८ कंपन्या भुईसपाट; फक्त 'या' २ वाचल्या

Share Market Crashe : ऑक्टोबर महिन्यापासून शेअर बाजारात सुरू झालेली घसरण थांबायचं नाव घेताना दिसत आहे. मिड आणि स्मॉल कॅप कंपन्याची सर्वात वाईट अवस्था झाली आहे. पण, याची झळ आता दिग्गज कंपन्यांनाही बसत आहे. गेल्या आठवड्यातील शेअर बाजारातील उद्ध्वस्ततेचा परिणाम देशातील बड्या कंपन्यांच्या आकडेवारीत स्पष्टपणे दिसून येत आहे. देशातील टॉप १० कंपन्यांपैकी ८ कंपन्यांचे मार्केट कॅप ३ लाख कोटी रुपयांहून अधिक कमी  झाले आहे. फक्त दोनच कंपन्या यातून सुटल्या असून त्यांच्यात चांगली वाढ झाली आहे.

एचडीएफसी बँकेच्या मार्केट कॅपमध्ये ३० हजार कोटी रुपयांहून अधिक वाढ झाली आहे. दुसरीकडे, बजाज फायनान्सच्या मार्केट कॅपमध्ये ९ हजार कोटी रुपयांची वाढ झाली आहे

टीसीएस आणि इन्फोसिसीमध्ये मोठी घसरण
टाटा समूहाची कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या बाजार भांडवलात १,०९,२११.९७ कोटी रुपयांची घसरण झाली. घसरणीनंतर कंपनीचे मूल्यांकन १२,६०,५०५.५१ कोटी रुपयांवर आले, तर आघाडीची आयटी कंपनी इन्फोसिसचे मूल्य ५२,९०,७२० कोटी रुपयांनी घसरले.

एअरटेल आणि आरआयएललाही धक्का
भारती एअरटेलचे बाजार भांडवल ३९,२३०.१ कोटी रुपयांनी घसरून ८,९४,९९३.६७ कोटी रुपये झाले, तर रिलायन्स इंडस्ट्रीजचे बाजार भांडवल ३८,०२५.९७ कोटी रुपयांनी घसरून १६,२३,३४३.४५ कोटी रुपये झाले.

या कंपन्यांनाही मोठा तोटा
या व्यतिरिक्त, स्टेट बँक ऑफ इंडिया चे बाजार भांडवल २९,७१८.९९ कोटी रुपयांनी कमी होऊन ६,१४,२३६.९७ कोटी रुपये झाले, तर ICICI बँकेचे मूल्यांकन २०,७७५.७८ कोटी रुपयांनी घसरुन ८,४९,८०३.९० कोटी रुपये झाले आहे.

त्याच वेळी, हिंदुस्तान युनिलिव्हरचे मूल्यांकन ११,७००.९७ कोटी रुपयांनी घसरले आणि त्याचे एकूण मूल्यांकन ५,१४,९८३.४१ कोटी रुपये झाले, तर आयटीसीचे बाजार भांडवलही ७,८८२.८६ कोटी रुपयांनी घसरून ४,९३,८६७ कोटी रुपयांवर आले.

एचडीएफसी आणि बजाज फायनान्समध्ये वाढ
दरम्यान, एचडीएफसी बँकेचे बाजार भांडवल ३०,२५८.४९ कोटींनी वाढून तिचे मूल्यांकन १३,२४,४११.३१ कोटी रुपये झाले. तसेच, बजाज फायनान्सने ९,०५०.२४ कोटी रुपयांची झेप घेतली असून तिचे एकूण बाजार भांडवल आता ५,२९,५१६.९९ कोटी रुपये झाले आहे.

या आहेत देशातील १० दिग्गज कंपन्या
गेल्या आठवड्यात शेअर बाजारात मोठी घसरण झाली असली तरी, मुकेश अंबानींच्या मालकीची कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) सर्वाधिक मूल्यवान कंपनी राहिली आहे. त्यानंतर HDFC बँक, TCS, भारती एअरटेल, ICICI बँक, इन्फोसिस, स्टेट बँक ऑफ इंडिया, बजाज फायनान्स, हिंदुस्थान युनिलिव्हर आणि ITC यांचा क्रमांक लागतो.

 

Web Title: top 10 companies valuation decline by 3 lakh crore last week tcs biggest decline hdfc bank and bajaja increase

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.