lokmat Supervote 2024
Lokmat Money >शेअर बाजार > आठवड्याचा शेवट गोड; सेन्सेक्समध्ये 190 तर निफ्टीमध्ये 84 अंकांची उसळी...

आठवड्याचा शेवट गोड; सेन्सेक्समध्ये 190 तर निफ्टीमध्ये 84 अंकांची उसळी...

Stock Market Highlights: आठवड्याच्या शेवटच्या ट्रेडिंग सत्रात बँकिंग, ऑटो, फार्मा शेअर्समध्ये वाढ.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2024 05:14 PM2024-03-22T17:14:15+5:302024-03-22T17:15:07+5:30

Stock Market Highlights: आठवड्याच्या शेवटच्या ट्रेडिंग सत्रात बँकिंग, ऑटो, फार्मा शेअर्समध्ये वाढ.

Stock Market Highlights: 190 points in Sensex and 84 points in Nifty | आठवड्याचा शेवट गोड; सेन्सेक्समध्ये 190 तर निफ्टीमध्ये 84 अंकांची उसळी...

आठवड्याचा शेवट गोड; सेन्सेक्समध्ये 190 तर निफ्टीमध्ये 84 अंकांची उसळी...

Stock Market Highlights: या आठवड्याच्या शेवटच्या ट्रेडिंग सत्रात(दि.22) शेअर बाजार तेजीसह बंद झाला. सेन्सेक्सने 190 अंकांची उसळी घेऊन 72832 वर पोहोचला, तर निफ्टी 84 अंकांच्या उसळीसह 22096 वर बंद झाला. मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकही सुमारे अर्धा टक्का वाढले. तर, आयटी निर्देशांकात 2.33 टक्क्यांची घसरण पाहायला मिळाली. हिरो मोटोकॉर्प, मारुती आणि सन फार्मा निफ्टीमध्ये सर्वाधिक वाढले. तर, माइंडट्री, इन्फोसिस, विप्रो आणि HCL टेक्नॉलॉजीला मोठा फटका बसला.

गुंतवणूकदारांच्या संपत्तीत वाढ
आजच्या वाढीमुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत मोठी वाढ झाली. बीएसईवर सूचीबद्ध शेअर्सचे एकूण बाजार मूल्य 382.13 लाख कोटी रुपये झाले. हे काल 380 लाख कोटी रुपये होते. म्हणजेच आजच्या सत्रात शेअर बाजाराच्या बाजार भांडवलात 2.13 लाख कोटी रुपयांची वाढ झाली. बीएसईच्या आकडेवारीनुसार, आज एकूण 3906 शेअर्सचे व्यवहार झाले, ज्यामध्ये 2431 शेअर्स वाढीसह बंद झाले, तर 1375 शेअर्सला फटका बसला. 

आजच्या व्यवहारात बँकिंग, ऑटो, फार्मा, एफएमसीजी, मेटल, रिअल इस्टेट, मीडिया, एनर्जी, इन्फ्रा, कंझ्युमर ड्युरेबल्स, हेल्थकेअर आणि ऑइल अँड गॅस शेअर्स मजबूत वाढीसह बंद झाले. मात्र, आयटी शेअर्समध्ये मोठी घसरण दिसून आली आहे. आजच्या व्यवहारात मारुती सुझुकी 3.55%, सन फार्मा 2.77%, टायटन 2.21%, आयटीसी 1.71% टक्क्यांच्या वाढीसह बंद झाले. तर, इन्फोसिस 2.98 टक्के, विप्रो 2.73 टक्के, एचसीएल टेक 2.46 टक्के घसरणीसह बंद झाले.

Web Title: Stock Market Highlights: 190 points in Sensex and 84 points in Nifty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.