Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money >शेअर बाजार > ३ दिवसांपासून शेअरला सातत्यानं लागतंय अपर सर्किट; आता ₹३१ वर आला शेअर, 'या' घोषणेचा परिणाम

३ दिवसांपासून शेअरला सातत्यानं लागतंय अपर सर्किट; आता ₹३१ वर आला शेअर, 'या' घोषणेचा परिणाम

Spice Lounge Food Works: या कंपनीच्या शेअरमध्ये आज शुक्रवारी सलग तिसऱ्या दिवशी जबरदस्त तेजी पाहायला मिळाली. जोरदार खरेदीमुळे या स्मॉल-कॅप स्टॉकमध्ये आज पुन्हा एकदा ५ टक्क्यांचं अपर सर्किट लागलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2026 13:02 IST2026-02-06T13:02:54+5:302026-02-06T13:02:54+5:30

Spice Lounge Food Works: या कंपनीच्या शेअरमध्ये आज शुक्रवारी सलग तिसऱ्या दिवशी जबरदस्त तेजी पाहायला मिळाली. जोरदार खरेदीमुळे या स्मॉल-कॅप स्टॉकमध्ये आज पुन्हा एकदा ५ टक्क्यांचं अपर सर्किट लागलं

Spice Lounge Food Works stock continuously going through an upper circuit for 3 days now the stock has reached rs 31 the result of this announcement | ३ दिवसांपासून शेअरला सातत्यानं लागतंय अपर सर्किट; आता ₹३१ वर आला शेअर, 'या' घोषणेचा परिणाम

३ दिवसांपासून शेअरला सातत्यानं लागतंय अपर सर्किट; आता ₹३१ वर आला शेअर, 'या' घोषणेचा परिणाम

Spice Lounge Food Works: स्पाइस लाउंज फूड वर्क्सच्या शेअर्समध्ये आज शुक्रवारी सलग तिसऱ्या दिवशी जबरदस्त तेजी पाहायला मिळाली. जोरदार खरेदीमुळे या स्मॉल-कॅप स्टॉकमध्ये आज पुन्हा एकदा ५ टक्क्यांचं अपर सर्किट लागलं आणि बीएसईवर हा शेअर ३१.२५ रुपयांच्या भावावर पोहोचला. गेल्या पाच व्यापारी सत्रांतील मोठ्या घसरणीनंतर आता या शेअरमध्ये वेगानं सुधारणा होताना दिसत आहे. गेल्या तीन दिवसांतच हा स्टॉक १५ टक्क्यांहून अधिक वधारला असून, यामुळे गुंतवणूकदारांमध्ये पुन्हा एकदा उत्साह वाढला आहे.

शेअर्समधील तेजीचं मुख्य कारण

कंपनीच्या शेअर्समध्ये झालेली ही वाढ तिच्या अलीकडील मोठ्या घोषणेनंतर पाहायला मिळत आहे. स्पाइस लाउंज फूड वर्क्सनं दिलेल्या माहितीनुसार, त्यांचं लाइव्ह कल्चर आणि एंटरटेनमेंट प्लॅटफॉर्म ‘XORA वर्ल्ड’ प्रसिद्ध संगीतकार हॅरिस जयराज यांच्या कॉन्सर्टचे हैदराबादमध्ये पहिल्यांदाच आयोजन करणार आहे. हा कॉन्सर्ट २६ एप्रिल २०२६ रोजी पार पडणार आहे. कंपनीनं एक्सचेंजला दिलेल्या माहितीनुसार, XORA वर्ल्ड हे राइटफेस्टचे प्रॉपराइटरी प्लॅटफॉर्म आहे, जे स्पाइस लाउंज फूड वर्क्सच्या पूर्ण मालकीची समूह संस्था आहे.

भारताचं पहिलं युनिकॉर्न स्टार्टअप आणणार IPO; ₹४५०० कोटी उभे करण्याची तयारी, पाहा डिटेल्स

कंपनीच्या मते, XORA वर्ल्डच्या माध्यमातून त्यांना तिकीट आधारित लाइव्ह एंटरटेनमेंटला एका मोठ्या व्यवसायाच्या रूपात उभे करायचे आहे, जे त्यांच्या इतर ग्राहक व्यवसायांनाही आधार देईल. यापूर्वी कंपनीनं २८ मार्च २०२६ रोजी हैदराबादच्या गाचीबोवली स्टेडियमवर महान संगीतकार इलैयाराजा यांच्या ५० वर्षांच्या सांगीतिक प्रवासाचा उत्सव साजरा करणाऱ्या एका मोठ्या इव्हेंटची घोषणा केली आहे. या आयोजनांवरून असे स्पष्ट होत आहे की, कंपनी आता केवळ रेस्टॉरंट व्यवसायापुरती मर्यादित राहू इच्छित नाही.

शेअर्सची कामगिरी आणि परतावा

शेअरच्या कामगिरीवर नजर टाकली तर अलीकडच्या काही महिन्यांत यामध्ये बरीच चढ-उतार पाहायला मिळाली आहे. स्पाइस लाउंज फूड वर्क्सचा शेअर एका महिन्यात सुमारे २५ टक्के आणि तीन महिन्यांत ४० टक्क्यांपर्यंत घसरला आहे. सहा महिन्यांत यात २३ टक्क्यांहून अधिक घसरण झाली आहे. मात्र, दीर्घ मुदतीचा विचार केल्यास या स्टॉकनं गुंतवणूकदारांना अफाट परतावा दिला आहे. एका वर्षात हा शेअर १२५ टक्क्यांनी वधारला आहे, तीन वर्षांत सुमारे ६५० टक्के तेजी आली आहे, तर पाच वर्षांत या शेअर्सनी तब्बल २५०० टक्क्यांचा मल्टीबॅगर परतावा दिलाय.

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्य कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title : कॉन्सर्ट घोषणा के बाद स्पाइस लाउंज का शेयर उछला: तीसरा अपर सर्किट!

Web Summary : स्पाइस लाउंज फूड वर्क्स के शेयर की कीमत लगातार तीसरे दिन अपर सर्किट पर, ₹31 पर पहुंची। यह उछाल उनके XORA वर्ल्ड प्लेटफॉर्म के तहत हैरिस जयराज द्वारा हैदराबाद में एक संगीत कार्यक्रम की घोषणा के बाद आया है। शेयरों में तीन दिनों में 15% से अधिक की वृद्धि हुई है।

Web Title : Spice Lounge Share Soars After Concert Announcement: Third Upper Circuit!

Web Summary : Spice Lounge Food Works share price hits upper circuit for the third consecutive day, reaching ₹31. The surge follows the announcement of a Hyderabad concert by Harris Jayaraj under their XORA World platform. Shares have risen over 15% in three days.