Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money >शेअर बाजार > भारताचं पहिलं युनिकॉर्न स्टार्टअप आणणार IPO; ₹४५०० कोटी उभे करण्याची तयारी, पाहा डिटेल्स

भारताचं पहिलं युनिकॉर्न स्टार्टअप आणणार IPO; ₹४५०० कोटी उभे करण्याची तयारी, पाहा डिटेल्स

InMobi IPO: भारतीय स्टार्टअप जगतातून एक मोठी बातमी समोर येत आहे. देशातील पहिलं युनिकॉर्न स्टार्टअप आता शेअर बाजारामध्ये लिस्ट होण्याच्या तयारीत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2026 12:26 IST2026-02-06T12:25:03+5:302026-02-06T12:26:18+5:30

InMobi IPO: भारतीय स्टार्टअप जगतातून एक मोठी बातमी समोर येत आहे. देशातील पहिलं युनिकॉर्न स्टार्टअप आता शेअर बाजारामध्ये लिस्ट होण्याच्या तयारीत आहे.

India s first unicorn startup InMobi to launch IPO Preparing to raise rs 4500 crore check listing details | भारताचं पहिलं युनिकॉर्न स्टार्टअप आणणार IPO; ₹४५०० कोटी उभे करण्याची तयारी, पाहा डिटेल्स

भारताचं पहिलं युनिकॉर्न स्टार्टअप आणणार IPO; ₹४५०० कोटी उभे करण्याची तयारी, पाहा डिटेल्स

InMobi IPO: भारतीय स्टार्टअप जगतातून एक मोठी बातमी समोर येत आहे. देशातील पहिलं युनिकॉर्न स्टार्टअप 'इनमोबी' (InMobi) आता शेअर बाजारामध्ये लिस्ट होण्याच्या तयारीत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कंपनी ५० कोटी डॉलरपेक्षा (सुमारे ४,५०० कोटी रुपयांहून अधिक) मोठा आयपीओ (IPO) आणण्याच्या योजनेवर काम करत आहे. यासाठी कंपनीने नुकतेच ८ आघाडीच्या गुंतवणूक बँकांशी संपर्क साधलाय.

मोठ्या गुंतवणूक बँकांशी चर्चा सुरू

इनमोबीनं आयपीओ प्रक्रियेसाठी कोटक महिंद्रा कॅपिटल, ॲक्सिस कॅपिटल, जेफरीज, जेपी मॉर्गन, मोतीलाल ओसवाल, IIFL कॅपिटल, बीओएफए सिक्युरिटीज आणि यूबीएस यांसारख्या बँकांशी चर्चा सुरू केल्याची माहिती समोर आलीये. सध्या ही चर्चा प्रगत टप्प्यावर असून, गरजेनुसार या यादीत आणखी बँकांची नावं जोडली जाऊ शकतात.

Crypto मार्केटमध्ये भूकंप: Bitcoin अडीच वर्षांच्या नीचांकी स्तरावर; कोट्यवधी बुडाले, गुंतवणूकदार हादरले

४ ते ५ अब्ज डॉलरच्या व्हॅल्युएशनचं टार्गेट

बाजारपेठेतील सूत्रांनुसार, इनमोबी या आयपीओद्वारे ४ अब्ज डॉलर ते ५ अब्ज डॉलर दरम्यान व्हॅल्युएशन मिळवण्याचं टार्गेट ठेवून आहे. विशेष म्हणजे, २०११ मध्ये इनमोबी ही १ अब्ज डॉलरचे व्हॅल्युएशन पार करून भारतातील पहिली 'युनिकॉर्न' कंपनी ठरली होती, जो भारतीय स्टार्टअप इतिहासातील एक मैलाचा दगड मानला जातो.

सिंगापूरहून भारतात तळ हलवण्याची प्रक्रिया

कंपनी आयपीओपूर्वी 'प्री-आयपीओ राउंड' देखील करू शकते. तसंच, इनमोबी आपले मुख्य केंद्र सिंगापूरवरून भारतात हलवण्याच्या प्रक्रियेत आहे, ज्यावरून कंपनी भारतीय शेअर बाजारात लिस्ट होण्याबाबत गंभीर असल्याचं दिसून येतं. सॉफ्टबँककडून शेअर्स बायबॅक केल्यानंतर आता कंपनीत संस्थापकांकडे बहुतांश हिस्सा आहे. याशिवाय शेरपालो व्हेंचर्स आणि क्लेनर पर्किन्स यांसारख्या मोठ्या जागतिक गुंतवणूकदारांचाही कंपनीला पाठिंबा आहे.

२००७ मध्ये सुरू झालेली इनमोबी ही एक कन्झुमर टेक्नॉलॉजी कंपनी आहे. ही कंपनी डिजिटल प्लॅटफॉर्म आणि मोबाइल जाहिरात सोल्यूशन्सच्या माध्यमातून व्यवसायाला गती देते. कंपनी आपल्या व्यवसायात मोठ्या प्रमाणावर आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा (AI) वापर करते.

कंपनीचं नेतृत्व आणि आर्थिक स्थिती

कंपनीच्या नेतृत्वात नवीन तिवारी (संस्थापक आणि सीईओ), अभय सिंघल (सह-संस्थापक आणि सीईओ, इनमोबी ॲडव्हर्टायझिंग), मोहित सक्सेना (संस्थापक आणि सीटीओ) आणि पीयूष शाह (संस्थापक आणि प्रेसिडेंट, ग्लांस) यांचा समावेश आहे. सप्टेंबर २०२४ मध्ये, इनमोबीने मार्स ग्रोथ कॅपिटलसोबत १० कोटी डॉलर्सचा डेट फायनान्सिंग करार पूर्ण केला होता. आता आयपीओच्या तयारीमुळे इनमोबी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

Web Title : भारत का पहला यूनिकॉर्न स्टार्टअप InMobi ₹4500 करोड़ का IPO लाएगा

Web Summary : भारत का पहला यूनिकॉर्न InMobi ₹4500 करोड़ जुटाने के लिए IPO की तैयारी कर रहा है। कंपनी ने निवेश बैंकों के साथ बातचीत की है और $4-5 बिलियन का मूल्यांकन लक्षित है। InMobi अपना मुख्यालय सिंगापुर से भारत में स्थानांतरित कर रहा है।

Web Title : InMobi, India's First Unicorn Startup, Plans IPO to Raise ₹4500 Crore

Web Summary : InMobi, India's first unicorn, is preparing for an IPO aiming to raise ₹4500 crore. The company has engaged with investment banks and targets a valuation between $4-5 billion. InMobi is also shifting its headquarters from Singapore to India.