Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money >शेअर बाजार > दोन भागात विभागला जाणार ३८ वर्ष जुन्या कंपनीचा शेअर; रेकॉर्ड डेट जवळ, ५ वर्षांत ६५०% चा दिला रिटर्न

दोन भागात विभागला जाणार ३८ वर्ष जुन्या कंपनीचा शेअर; रेकॉर्ड डेट जवळ, ५ वर्षांत ६५०% चा दिला रिटर्न

Stock Split News: कंपनीच्या एका शेअरचं दोन भागांत विभाजन केलं जाणारे. या स्टॉक स्प्लिटसाठी कंपनीने शुक्रवारी 'रेकॉर्ड डेट'ची घोषणा करण्यात आली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2026 14:11 IST2026-02-21T14:11:50+5:302026-02-21T14:11:50+5:30

Stock Split News: कंपनीच्या एका शेअरचं दोन भागांत विभाजन केलं जाणारे. या स्टॉक स्प्लिटसाठी कंपनीने शुक्रवारी 'रेकॉर्ड डेट'ची घोषणा करण्यात आली आहे.

Shares of 38 year old company Varvee Global Ltd to be split into two Record date march first week returns of 650 percent in 5 years | दोन भागात विभागला जाणार ३८ वर्ष जुन्या कंपनीचा शेअर; रेकॉर्ड डेट जवळ, ५ वर्षांत ६५०% चा दिला रिटर्न

दोन भागात विभागला जाणार ३८ वर्ष जुन्या कंपनीचा शेअर; रेकॉर्ड डेट जवळ, ५ वर्षांत ६५०% चा दिला रिटर्न

Stock Split News: वारवी ग्लोबल लिमिटेड (Varvee Global Ltd) आपल्या शेअर्सचं विभाजन करणार आहे. कंपनीच्या एका शेअरचं दोन भागांत विभाजन केलं जाणारे. या स्टॉक स्प्लिटसाठी कंपनीने शुक्रवारी 'रेकॉर्ड डेट'ची घोषणा केली असून ती मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात निश्चित करण्यात आली आहे. कंपनीनं शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार, १० रुपये फेस व्हॅल्यू असलेला एक शेअर दोन तुकड्यांत विभागला जाईल. या प्रक्रियेसाठी कंपनीनं २ मार्च २०२६ ही तारीख रेकॉर्ड डेट म्हणून घोषित केली.

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!

गेल्या वर्षभरातील शेअर्सची कामगिरी

शुक्रवारी वारवी ग्लोबल लिमिटेडचा शेअर २.७१ टक्क्यांच्या वाढीसह १३६.३० रुपयांच्या पातळीवर बंद झाला. गेल्या सहा महिन्यांचा विचार करता, स्टॉकच्या किमतीत २८ टक्क्यांची घसरण झाली आहे. तसंच, गेल्या एका वर्षात कंपनीच्या शेअरचा भाव ७.०४ टक्क्यांनी खाली घसरला; याच कालावधीत सेन्सेक्समध्ये ९.३५ टक्क्यांची वाढ झाली. वारवी ग्लोबल लिमिटेडचा ५२ आठवड्यांतील उच्चांकी स्तर १९७ रुपये, तर निचांकी स्तर ११३.०५ रुपये आहे. कंपनीचं एकूण मार्केट कॅप ३५१ कोटी रुपये आहे.

५ वेळा दिली CA ची परीक्षा, पण आज फूड क्वीन म्हणून आहे ओळख! Instagram वर आहेत लाखो फॉलोअर्स

५ वर्षांत गुंतवणूकदारांना मिळाला मल्टीबॅगर परतावा

जरी गेल्या वर्षभरात शेअर्समध्ये घसरण झाली असली, तरी दीर्घकाळात या कंपनीनं गुंतवणूकदारांना मालामाल केलंय. गेल्या दोन वर्षांत कंपनीच्या शेअर्सच्या किमतीत २८७ टक्के, तर तीन वर्षांत ४८३ टक्क्यांची वाढ झाली आहे. गेल्या पाच वर्षांत या मल्टीबॅगर स्टॉकचा भाव ६५० टक्क्यांनी वधारलाय, तर याच काळात सेन्सेक्समध्ये ६२ टक्क्यांची वाढ झाली आहे. कंपनीनं शेवटचा लाभांश २०१२ मध्ये दिला होता, जो प्रति शेअर ०.५० रुपये होता. डिसेंबर २०२५ च्या तिमाहीअखेर या कंपनीत प्रवर्तकांचा हिस्सा ६५.६३ टक्के असून सार्वजनिक हिस्सा ३४.३७ टक्के आहे.

कंपनीची पार्श्वभूमी आणि उत्पादन

वारवी ग्लोबल लिमिटेड ही एक टेक्सटाईल क्षेत्रातील कंपनी असून तिची सुरुवात १९८८ मध्ये झाली होती. ही कंपनी प्रामुख्यानं डेनिम फॅब्रिक्स आणि नॉन-डेनिम फॅब्रिक्स यांसारख्या उत्पादनांची विक्री करते. कापड उद्योगातील या जुन्या कंपनीनं आपल्या दीर्घकालीन गुंतवणूकदारांना आतापर्यंत चांगला परतावा दिलाय.

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: Shares of 38 year old company Varvee Global Ltd to be split into two Record date march first week returns of 650 percent in 5 years