Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money >शेअर बाजार > ५ दिवसांत ३३०० अंकांनी आपटला Sensex; ₹१९ लाख कोटी स्वाहा, पुढे आणखी खराब होणार का स्थिती?

५ दिवसांत ३३०० अंकांनी आपटला Sensex; ₹१९ लाख कोटी स्वाहा, पुढे आणखी खराब होणार का स्थिती?

Share Market Crash: गेला आठवडा शेअर बाजारासाठी एखाद्या वाईट स्वप्नासारखा ठरला आहे. अवघ्या कामकाजाच्या ५  दिवसांत गुंतवणूकदारांचं १९ लाख कोटी रुपये बुडाले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2026 15:33 IST2026-03-07T15:30:56+5:302026-03-07T15:33:05+5:30

Share Market Crash: गेला आठवडा शेअर बाजारासाठी एखाद्या वाईट स्वप्नासारखा ठरला आहे. अवघ्या कामकाजाच्या ५  दिवसांत गुंतवणूकदारांचं १९ लाख कोटी रुपये बुडाले आहेत.

Sensex plunges by 3300 points in 5 days rs 19 lakh crore wiped out will the situation worsen further | ५ दिवसांत ३३०० अंकांनी आपटला Sensex; ₹१९ लाख कोटी स्वाहा, पुढे आणखी खराब होणार का स्थिती?

५ दिवसांत ३३०० अंकांनी आपटला Sensex; ₹१९ लाख कोटी स्वाहा, पुढे आणखी खराब होणार का स्थिती?

Share Market Crash: गेला आठवडा शेअर बाजारासाठी एखाद्या वाईट स्वप्नासारखा ठरला आहे. अवघ्या कामकाजाच्या ५  दिवसांत गुंतवणूकदारांचं १९ लाख कोटी रुपये बुडाले आहेत. अमेरिका आणि इराणमधील युद्धामुळे जगभरात अनिश्चिततेचं वातावरण असून, त्याचा वाईट परिणाम भारतीय शेअर बाजारावरही झालाय. गेल्या ५ कामकाजाच्या दिवसांत सेन्सेक्समध्ये ३,३०० अंकांची मोठी घसरण झाली. यामुळे आता पुढे काय होईल, असा प्रश्न गुंतवणूकदारांच्या मनात निर्माण झालाय.

या क्षेत्रांमध्ये मोठी घसरण, तर डिफेन्स स्टॉक्समध्ये तेजी

गेल्या आठवड्यात सार्वजनिक क्षेत्रातील बँका, पर्यटन आणि विमान वाहतूक, रिअल इस्टेट, बँकिंग आणि ऑटो क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्सची स्थिती अत्यंत खराब राहिली. मात्र, या दरम्यान गुंतवणूकदारांमध्ये डिफेन्स स्टॉक्स खरेदी करण्याची चढाओढ पाहायला मिळाली. युद्धजन्य परिस्थितीमुळे माझगाव डॉक, सोलर इंडस्ट्रीज आणि पारस डिफेन्स यांसारख्या कंपन्यांच्या शेअर्सच्या किमतीत वाढ झाली आहे. 'इकॉनॉमिक टाइम्स'च्या अहवालानुसार, ज्या कंपन्यांचं मार्केट कॅप १,००० कोटी रुपयांहून अधिक आहे, अशा ८० टक्के कंपन्यांच्या शेअर्समध्ये त्यांच्या 'ऑल टाइम हाय'च्या तुलनेत २० टक्क्यांची घसरण झाली. तसंच निफ्टीही आपल्या उच्चांकावरून ७ टक्क्यांनी घसरला आहे.

AI खाऊ लागली नोकऱ्या, आता 'या' विस्तारासाठी Oracle ३० हजार लोकांना कामावरुन काढणार?

कच्चे तेल १०० डॉलरच्या पार जाण्याची शक्यता

अमेरिका-इराण युद्धामुळे जगातील कच्च्या तेलाचा पुरवठा विस्कळीत झाला आहे. यामुळे येणाऱ्या काळात कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ होऊ शकते. अनेक तज्ज्ञांच्या मते, जर हे युद्ध लवकर संपले नाही, तर कच्च्या तेलाचा दर प्रति बॅरल १०० डॉलरचा टप्पा ओलांडू शकतो.

बाजार चार्टवर कमकुवत स्थिती: तज्ज्ञांचा इशारा

'इकॉनॉमिक टाइम्स'च्या अहवालानुसार, सध्या बाजार शॉर्ट टर्म आणि मीडियम टर्म सरासरीच्या खाली व्यापार करत आहे. चार्ट पॅटर्नवरील 'वीक कॅंडल' कमकुवत स्थितीकडे निर्देश करत आहेत. शेअर बाजार तज्ज्ञ बोलिंजक यांच्या मते, शॉर्ट टर्म कालावधी अनिश्चिततेनं भरलेला आहे. वाढत्या तेलाच्या किमती गुंतवणूकदारांच्या मानसिकतेवर परिणाम करत आहेत. अशा परिस्थितीत गुंतवणुकीच्या काही चांगल्या संधी निर्माण होतील, मात्र त्यासाठी 'लॉन्ग टर्म' दृष्टिकोन ठेवणं आवश्यक आहे.

Web Title : सेंसेक्स 5 दिनों में 3300 अंक गिरा; ₹19 लाख करोड़ का नुकसान

Web Summary : अमेरिका-ईरान तनाव के बीच शेयर बाजार में गिरावट, 5 दिनों में ₹19 लाख करोड़ स्वाहा। सार्वजनिक क्षेत्र के बैंकों और ऑटो क्षेत्र को नुकसान, रक्षा शेयरों में उछाल। विशेषज्ञों ने अस्थिरता और तेल की बढ़ती कीमतों के बारे में चेतावनी दी है।

Web Title : Sensex Plunges 3300 Points in 5 Days; ₹19 Lakh Crore Lost

Web Summary : Share market crashes amid US-Iran tensions, wiping out ₹19 lakh crore in 5 days. Public sector banks and auto sectors suffered losses, while defense stocks surged. Experts warn of continued volatility and rising oil prices impacting investor sentiment.