lokmat Supervote 2024
Lokmat Money >शेअर बाजार > सेन्सेक्स-निफ्टी जोरदार आपटला; ६ लाख कोटींचं नुकसान, स्मॉल कॅप शेअरमध्ये विक्री वाढली

सेन्सेक्स-निफ्टी जोरदार आपटला; ६ लाख कोटींचं नुकसान, स्मॉल कॅप शेअरमध्ये विक्री वाढली

शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात विक्री झाल्यामुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 6 लाख कोटी रुपयांची घट झाली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2024 03:56 PM2024-02-28T15:56:35+5:302024-02-28T15:56:48+5:30

शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात विक्री झाल्यामुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 6 लाख कोटी रुपयांची घट झाली आहे.

Sensex Nifty hit hard investors 6 lakh crore loss sales increased in small cap shares market cap reduced | सेन्सेक्स-निफ्टी जोरदार आपटला; ६ लाख कोटींचं नुकसान, स्मॉल कॅप शेअरमध्ये विक्री वाढली

सेन्सेक्स-निफ्टी जोरदार आपटला; ६ लाख कोटींचं नुकसान, स्मॉल कॅप शेअरमध्ये विक्री वाढली

Closing Bell Today - बुधवारी मिडकॅप, स्मॉल कॅप आणि मायक्रो कॅप निर्देशांकात दोन टक्क्यांहून अधिक घसरण नोंदवली गेली. शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात विक्री झाल्यामुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 6 लाख कोटी रुपयांची घट झाली आहे. मुंबई शेअर बाजारातील सर्व लिस्टेड कंपन्यांचे मार्केट कॅप 386 लाख कोटी रुपये झालंय. बुधवारी बीएसई सेन्सेक्स 790 अंकांनी घसरला आणि 72,304 अंकांच्या पातळीवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 247 अंकांनी घसरून 21951 अंकांच्या पातळीवर बंद झाला.
 

बुधवारी शेअर बाजाराच्या अस्थिर व्यवहारादरम्यान कामधेनू लिमिटेड, आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफ, ओम इन्फ्रा, स्टोव्ह क्राफ्ट आणि ब्रँड कॉन्सेप्टच्या शेअर्समध्ये वाढ झाली, तर हिंदुस्तान झिंक, एचडीएफसी लाईफ, ॲक्सिस बँक, टाटा मोटर्स, एनएमडीसी लिमिटेड, लार्सन अँड टुब्रो, एचडीएफसी बँक, नेस्ले इंडिया, आयसीआयसीआय बँक, ग्लोबस स्पिरिट, कोटक महिंद्रा बँक, ओएनजीसी, पंजाब अँड सिंध बँक, यूपीएल लिमिटेड, देवयानी इंटरनॅशनल, एशियन पेंट्स आणि महिंद्रा यांच्या शेअर्समध्ये मात्र घसरण दिसून आली.
 

अदानींचे सर्व शेअर्स घसरले
 

पेटीएमचे शेअर्सही बुधवारी 5 टक्क्यांच्या घसरणीसह झाले. बुधवारी गौतम अदानी समूहाच्या सर्व 10 लिस्टेड कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण नोंदवण्यात आली. अदानी एनर्जी सोल्युशन्सचे शेअर्स 4.52 टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाले तर अदानी विल्मर 1.55 टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाले.
 

बुधवारी सर्व निर्देशांक रेड झोनमध्ये कार्यरत होते. निफ्टी मिडकॅप 100 आणि बीएसई स्मॉल कॅपमध्ये दोन टक्क्यांहून अधिक घसरण दिसून आली, तर निफ्टी आयटी, निफ्टी बँक आणि निफ्टी एफएमसीजी एक टक्क्याच्या घसरणीसह बंद झाले.

Web Title: Sensex Nifty hit hard investors 6 lakh crore loss sales increased in small cap shares market cap reduced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.