PC Jewellers Stock Price: सध्या सोन्याच्या दरात तेजी आहे. पण सोन्याच्या दागिन्यांचा व्यवहार करणाऱ्या पीसी ज्वेलर्स लिमिटेड (PC Jewellers Limited) या कंपनीचे शेअर्स त्याहूनही वेगानं पळतायत. सोमवारी बाजार उघडल्यानंतर अर्ध्या तासातच त्यात सुमारे १५ टक्क्यांची वाढ झाली. या तेजीमुळे त्याची किंमत १९ रुपयांच्या पुढे गेली.
शुक्रवारी हा शेअर १६.७१ रुपयांवर बंद झाला. सोमवारी तो १७.२० रुपयांवर उघडला. त्यानंतर त्यात सातत्यानं वाढ होत गेली. अर्ध्या तासात हा शेअर सुमारे १५ टक्क्यांनी वधारून १९.१५ रुपयांवर पोहोचला. मात्र, त्यानंतर काहीशी घसरण झाली. सकाळी १० वाजता तो १२.२७ टक्क्यांनी वधारून १८.७६ रुपयांवर व्यवहार करत होता.
आठव्या वेतन आयोगानंतर तीन पट वाढणार कर्मचाऱ्यांची सॅलरी? केव्हापासून होणार लागू, जाणून घ्या अपडेट
तेजी कायम
गेल्या अनेक दिवसांपासून या शेअरमध्ये तेजी आहे. गेल्या पाच दिवसात त्यात जवळपास ५० टक्क्यांची वाढ झाली आहे. गेल्या वर्षी १७ डिसेंबरपासून त्यात घसरण सुरू झाली होती. त्यावेळी हा शेअर १९.१९ रुपयांवर होता. यावर्षी ३ मार्च रोजी हा शेअर ११ रुपयांच्या खाली घसरला होता. मात्र, त्यानंतर त्यात तेजी दिसून आली. पण चढ-उतार कायम राहिले.
वर्षभरात २०० टक्क्यांहून अधिक परतावा
या शेअरनं वर्षभरात गुंतवणूकदारांना २०० टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. तर, एका वर्षात सोन्याचा परतावा सुमारे ३० टक्के राहिला आहे. म्हणजेच या शेअरनं सोन्यापेक्षा जास्त परतावा दिला आहे.
तेजी का आहे?
पीसी ज्वेलर्सनं एप्रिल ते जून या तिमाहीत सुमारे ८० टक्के कमाई केली आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, या तिमाहीत लग्न आणि सणासुदीमुळे ग्राहकांनी भरपूर खरेदी केली, ज्यामुळे कंपनीच्या कमाईत जबरदस्त वाढ झाली. दुसरीकडे, कंपनीनं आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये बँकांचं कर्ज निम्म्याहून अधिक कमी केलंय. आता आर्थिक वर्ष २०२६ च्या अखेरपर्यंत पूर्णपणे कर्जमुक्त होण्याचे कंपनीचं उद्दिष्ट आहे. हे उद्दिष्ट गाठण्यासाठी कंपनीनं या तिमाहीत बँकांवरील कर्जात सुमारे ७.५ टक्क्यांनी कपात केली.
(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)