Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money >शेअर बाजार > LIC चं गुंतवणूकदारांना मोठं गिफ्ट, पहिल्यांदाच देणार बोनस शेअर; कधी आहे रेकॉर्ड डेट, किती शेअर्स मिळणार?

LIC चं गुंतवणूकदारांना मोठं गिफ्ट, पहिल्यांदाच देणार बोनस शेअर; कधी आहे रेकॉर्ड डेट, किती शेअर्स मिळणार?

LIC Bonus Share News: देशातील सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसीनं आपल्या गुंतवणूकदारांना मोठी खूशखबर दिली आहे. कंपनी आपल्या गुंतवणूकदारांना बोनस शेअर्स देणार आहे, पाहा किती मिळणार बोनस शेअर्स.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2026 08:37 IST2026-04-14T08:32:33+5:302026-04-14T08:37:01+5:30

LIC Bonus Share News: देशातील सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसीनं आपल्या गुंतवणूकदारांना मोठी खूशखबर दिली आहे. कंपनी आपल्या गुंतवणूकदारांना बोनस शेअर्स देणार आहे, पाहा किती मिळणार बोनस शेअर्स.

LIC's big gift to investors, bonus shares will be given for the first time; When is the record date, how many shares will you get? | LIC चं गुंतवणूकदारांना मोठं गिफ्ट, पहिल्यांदाच देणार बोनस शेअर; कधी आहे रेकॉर्ड डेट, किती शेअर्स मिळणार?

LIC चं गुंतवणूकदारांना मोठं गिफ्ट, पहिल्यांदाच देणार बोनस शेअर; कधी आहे रेकॉर्ड डेट, किती शेअर्स मिळणार?

LIC Bonus Share News: देशातील सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसीनं (Life Insurance Corporation of India) आपल्या गुंतवणूकदारांना मोठी खूशखबर दिली आहे. कंपनीच्या बोर्डानं १:१ बोनस शेअर जारी करण्याची घोषणा केली असून, लिस्टिंगनंतर पहिल्यांदाच असा निर्णय घेण्यात आला आहे. याचा अर्थ असा की, जर एखाद्या गुंतवणूकदाराकडे एलआयसीचा १ शेअर असेल, तर त्याला रेकॉर्ड डेटनुसार १ अतिरिक्त शेअर मोफत मिळेल. यामुळे शेअर्सची संख्या दुप्पट होईल, मात्र गुंतवणुकीच्या एकूण मूल्यावर याचा लगेच कोणताही परिणाम होणार नाही, कारण शेअरची किंमत त्याच प्रमाणात अॅडजस्ट केली जाते.

बोनस शेअरची तांत्रिक माहिती

एलआयसी बोनस इश्यूअंतर्गत एकूण ६३२.४९ कोटी नवीन इक्विटी शेअर्स जारी करणार आहे, ज्यांचं फेस व्हॅल्यू (Face Value) १० रुपये असेल. या बोनससाठी कंपनी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंतच्या आकडेवारीनुसार आपल्या रिझर्व्ह आणि सरप्लस मधून ६,३२४.९९ कोटी रुपयांपर्यंतची रक्कम कॅपिटलाइज करणार आहे. बोनस इश्यू नंतर कंपनीचे पेड-अप शेअर कॅपिटल ६,३२४.९९ कोटी रुपयांवरून वाढून १२,६४९.९९ कोटी रुपये होईल. मात्र, कंपनीचं अधिकृत शेअर कॅपिटल २५,००० कोटी रुपयेच राहील, ज्यामध्ये २,५०० कोटी शेअर्सचा समावेश आहे.

श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला

भक्कम रिझर्व्ह आणि शेअरहोल्डिंग पॅटर्न

३१ डिसेंबर २०२५ पर्यंत एलआयसीकडे १.४६ लाख कोटी रुपयांचा मजबूत रिझर्व्ह उपलब्ध आहे, जो या बोनस इश्यूसाठी पूरक आहे. शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार, एलआयसीमध्ये सुमारे २१ लाख किरकोळ गुंतवणूकदार आहेत, ज्यांचा एकूण हिस्सा अंदाजे १.५% आहे. याव्यतिरिक्त म्युच्युअल फंड, एफपीआय (FPI) आणि सरकारचा मोठी हिस्सा आहे. सध्या एलआयसीच्या शेअरची किंमत त्याच्या इश्यू प्राईजपेक्षा कमी आहे.

बोनस शेअर देण्यामागचा उद्देश

एलआयसीचं हे पाऊल गुंतवणूकदारांचा विश्वास मजबूत करण्यासाठी आणि शेअरची लिक्विडीटी वाढवण्यासाठी उचललं गेल्याचं मानलं जातं. जेव्हा बाजारामध्ये एखाद्या शेअरची किंमत खूप जास्त होते, तेव्हा किरकोळ गुंतवणूकदारांना तो खरेदी करणे कठीण होतं. अशा परिस्थितीत, बोनस इश्यूद्वारे शेअरची किंमत परवडणाऱ्या पातळीवर आणली जाते, ज्यामुळे ट्रेडिंग वाढतं आणि नवीन गुंतवणूकदार आकर्षित होतात.

कंपनीची आर्थिक कामगिरी आणि नफा

अलीकडच्या काळात एलआयसीच्या शेअरवर थोडा दबाव दिसून आला असून या वर्षात आतापर्यंत त्यात सुमारे ५% घसरण झाली आहे, मात्र गेल्या एका वर्षात किरकोळ वाढीसह तो सकारात्मक राहिला आहे. आर्थिक कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर, डिसेंबर तिमाहीत एलआयसीनं जबरदस्त कामगिरी केलीये. कंपनीचा नफा वार्षिक आधारावर १७% नी वाढून १२,९३० कोटी रुपयांवर पोहोचलाय. तसंच नेट प्रीमियम इनकम देखील १७% वाढून १.२६ लाख कोटी रुपये राहिलंय, जे कंपनीची मजबूत वाढ दर्शवते.

शेअर बाजारातील कामगिरी

१३ एप्रिल २०२६ रोजी एलआयसीच्या शेअरमध्ये सकारात्मक कल पाहायला मिळाला, जिथे स्टॉक १.३३% च्या वाढीसह ८०९ रुपयांवर बंद झाला. ही वाढ बोनस शेअरच्या घोषणेनंतर गुंतवणूकदारांची वाढलेली उत्सुकता दर्शवते. एलआयसीचा हा बोनस इश्यू कंपनीची मजबूत बॅलन्स शीट आणि भविष्यातील कामगिरीबद्दल व्यवस्थापनाचा आत्मविश्वास दर्शवणारा मानला जातोय. दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी ही एक चांगली संधी असू शकते, मात्र गुंतवणुकीपूर्वी बाजाराची स्थिती आणि आपली आर्थिक उद्दिष्टे लक्षात घेणं आवश्यक आहे.

Web Title : LIC का तोहफा: बोनस शेयर जारी, रिकॉर्ड डेट और शेयर विवरण

Web Summary : एलआईसी ने लिस्टिंग के बाद पहली बार 1:1 बोनस शेयर जारी करने की घोषणा की। निवेशकों को प्रत्येक शेयर पर एक मुफ्त शेयर मिलेगा। इसका उद्देश्य निवेशकों का विश्वास और शेयर तरलता को बढ़ाना है। कंपनी का Q3 मुनाफा 17% बढ़कर ₹12,930 करोड़ हो गया, जो मजबूत वित्तीय प्रदर्शन दर्शाता है।

Web Title : LIC Offers Bonus Shares: Record Date & Share Details Announced

Web Summary : LIC announced a 1:1 bonus share issue, its first since listing. Investors get one free share per share owned. This aims to boost investor confidence and share liquidity. The company's Q3 profit rose 17% to ₹12,930 crore, indicating strong financial performance.