Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money >शेअर बाजार > LPG टंचाईचा Zomato आणि Swiggy ला मोठा फटका; शेअर्समध्ये मोठी घसरण

LPG टंचाईचा Zomato आणि Swiggy ला मोठा फटका; शेअर्समध्ये मोठी घसरण

LPG NEWS: देशातील फूड डिलिव्हरी क्षेत्रातील दिग्गज कंपन्या झोमॅटो आणि स्विगी यांना सध्या एलपीजी गॅसच्या टंचाईचा मोठा फटका बसत आहे. पाहा काय म्हणताहेत एक्सपर्ट्स?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2026 13:04 IST2026-03-12T13:02:08+5:302026-03-12T13:04:59+5:30

LPG NEWS: देशातील फूड डिलिव्हरी क्षेत्रातील दिग्गज कंपन्या झोमॅटो आणि स्विगी यांना सध्या एलपीजी गॅसच्या टंचाईचा मोठा फटका बसत आहे. पाहा काय म्हणताहेत एक्सपर्ट्स?

iran israel war LPG shortage hits Zomato and Swiggy stocks hard shares fall sharply | LPG टंचाईचा Zomato आणि Swiggy ला मोठा फटका; शेअर्समध्ये मोठी घसरण

LPG टंचाईचा Zomato आणि Swiggy ला मोठा फटका; शेअर्समध्ये मोठी घसरण

LPG NEWS: देशातील फूड डिलिव्हरी क्षेत्रातील दिग्गज कंपन्या झोमॅटो (Eternal Ltd.) आणि स्विगी (Swiggy Ltd.) यांना सध्या एलपीजी गॅसच्या टंचाईचा मोठा फटका बसत आहे. या संकटामुळे गुरुवारी, १२ मार्च रोजी या दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये ४ टक्क्यांहून अधिक घसरण झाली. देशभरातील रेस्टॉरंट्समध्ये व्यावसायिक एलपीजी सिलेंडरचा मोठा तुटवडा निर्माण झाला असून, यामुळे हॉटेलमधील कामं गंभीरपणे प्रभावित झाली आहेत.

एलपीजी संकट का निर्माण झालं?

पश्चिम आशियामध्ये अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या तणावाचा थेट परिणाम गॅस पुरवठ्यावर झाला आहे. जगातील सर्वात मोठ्या गॅस उत्पादक कंपन्यांपैकी एक असलेल्या 'कतार एनर्जी'ने 'फोर्स मेज्योर' (Force Majeure) घोषित केलं आहे. याचा परिणाम त्यांच्याशी संबंधित इतर कंपन्यांवर आणि ग्राहकांवर झाला असून, संपूर्ण पुरवठा साखळी विस्कळीत झाली.

रशियानं भारतासाठी उघडली कच्च्या तेलाची टाकी; पण प्रत्येक बॅरलवर वसूल केला जातोय प्रीमिअम चार्ज

रेस्टॉरंट व्यवसाय धोक्यात

व्यावसायिक एलपीजी सिलेंडरचा पुरवठा विस्कळीत झाल्यामुळे देशभरातील अनेक रेस्टॉरंट्सनी आपल्या मेन्यूमध्ये कपात केली आहे. पुरवठा सामान्य होईपर्यंत अनेक दुकानदारांना आपली दुकानं बंद ठेवण्याची वेळ आली आहे. सरकार घरगुती गॅसचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी प्रयत्न करत असलं, तरी व्यावसायिक वापरासाठीचे संकट अधिक गडद होत चाललंय.

५०% ते ६०% ऑर्डर प्रभावित

गिग वर्कर्स असोसिएशनच्या मते, या गॅस संकटामुळे फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्मवरील ५०% ते ६०% ऑर्डर्सवर परिणाम झाला आहे. या संकटामुळे सुमारे एक कोटी कामगारांना झळ पोहोचत असल्याचा दावा संघानं केलाय. या पार्श्वभूमीवर, झोमॅटो आणि स्विगीनं प्रत्येक प्रभावित कर्मचाऱ्यांना १०,००० रुपयांची मदत द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसंच कामगारांची आयडी डिअॅक्टिव्हेट करण्यावर तीन महिन्यांची बंदी आणि किमान दैनंदिन इन्सेन्टिव्ह्स देण्याची मागणीही करण्यात आली आहे.

शेअर बाजारात पडसाद

या बातमीचा बाजारावर नकारात्मक परिणाम दिसून आला. इटर्नलचे (झोमॅटो) शेअर्स ४.४% घसरून २१४ रुपयांवर आले, तर स्विगीचे शेअर्स ४% घसरून २७२ रुपयांवर व्यवहार करत आहेत. स्विगीचे शेअर्स त्यांच्या आयपीओ किंमतीपेक्षा (३९० रुपये) बरेच खाली आले आहेत. यासोबतच 'क्विक सर्व्हिस रेस्टॉरंट' क्षेत्रातील जुबिलेंट फूडवर्क्स (४%), सफायर फूड्स (३%), वेस्टलाईफ फूडवर्ल्ड (३%) आणि देवयानी इंटरनॅशनल (१%) यांच्या शेअर्समध्येही मोठी घसरण झाली आहे.

फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्मसाठी धोक्याची घंटा

मोतीलाल ओसवाल यांनी इशारा दिला आहे की, जर हा तुटवडा मार्चअखेरपर्यंत कायम राहिला, तर चौथ्या तिमाहीत ऑर्डर व्हॉल्यूममध्ये मोठी घट येऊ शकते. रेस्टॉरंटमध्ये मर्यादित वेळेतच खाद्यपदार्थ मिळणं किंवा किचन तात्पुरतं बंद राहणं यामुळे प्लॅटफॉर्मवर खाद्यपदार्थांची उपलब्धता कमी होईल, ज्याचा फटका थेट फूड डिलिव्हरी कंपन्यांच्या व्यवसायाला बसेल.

रेस्टॉरंटपुढील तांत्रिक अडचणी

एका छोट्या रेस्टॉरंटला दररोज साधारण १-२ व्यावसायिक सिलेंडर लागतात, तर मोठ्या हॉटेलला ६-१० सिलेंडरांची आवश्यकता असते. साठवणुकीची जागा मर्यादित असल्यामुळे बहुतेक रेस्टॉरंट्सकडे केवळ २ ते ६ दिवसांचाच स्टॉक असतो. त्यामुळे हा पुरवठा खंडित होणं हे हॉटेल व्यवसायासाठी मोठ्या संकटापेक्षा कमी नाही.

Web Title : एलपीजी की कमी से ज़ोमैटो, स्विगी प्रभावित; शेयरों में भारी गिरावट

Web Summary : एलपीजी की कमी से ज़ोमैटो और स्विगी के शेयर गिरे। रेस्टोरेंट का कामकाज बाधित, फूड डिलीवरी ऑर्डर प्रभावित। गैस आपूर्ति श्रृंखला संकट गहराया, जिससे फूड डिलीवरी प्लेटफॉर्म के राजस्व और हजारों कर्मचारियों पर असर पड़ा।

Web Title : LPG Shortage Hits Zomato, Swiggy; Shares Plunge Significantly

Web Summary : LPG shortage impacts Zomato and Swiggy, causing share declines. Restaurant operations are disrupted, affecting food delivery orders significantly. Gas supply chain issues worsen the crisis, threatening food delivery platform revenue and potentially impacting thousands of workers.