lokmat Supervote 2024
Lokmat Money >शेअर बाजार > आमिर खान आणि रणबीर रोज होताहेत मालामाल, 'हा' शेअर देतोय छप्परफाड कमाई; आजही लागला अप्पर सर्किट!

आमिर खान आणि रणबीर रोज होताहेत मालामाल, 'हा' शेअर देतोय छप्परफाड कमाई; आजही लागला अप्पर सर्किट!

बॉलीवूडचा 'मिस्टर पर्फेक्शनिस्ट' अभिनेता आमिर खान आणि अभिनेता रणबीर कपूर फक्त चित्रपटांमधूनच नव्हे तर शेअर बाजारातील गुंतवणुकीतूनही बराच पैसा कमावतात.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2023 11:05 PM2023-01-06T23:05:58+5:302023-01-06T23:10:25+5:30

बॉलीवूडचा 'मिस्टर पर्फेक्शनिस्ट' अभिनेता आमिर खान आणि अभिनेता रणबीर कपूर फक्त चित्रपटांमधूनच नव्हे तर शेअर बाजारातील गुंतवणुकीतूनही बराच पैसा कमावतात.

droneacharya aerial innovations stocks continue upper circuit bollywood celebs aamir khan and ranbir kapoor invest money | आमिर खान आणि रणबीर रोज होताहेत मालामाल, 'हा' शेअर देतोय छप्परफाड कमाई; आजही लागला अप्पर सर्किट!

आमिर खान आणि रणबीर रोज होताहेत मालामाल, 'हा' शेअर देतोय छप्परफाड कमाई; आजही लागला अप्पर सर्किट!

नवी दिल्ली-

बॉलीवूडचा 'मिस्टर पर्फेक्शनिस्ट' अभिनेता आमिर खान आणि अभिनेता रणबीर कपूर फक्त चित्रपटांमधूनच नव्हे तर शेअर बाजारातील गुंतवणुकीतूनही बराच पैसा कमावतात. सध्या त्यांची गुंतवणूक असलेला एक शेअर दररोज बक्कळ नफा कमावून देत आहे. अवघ्या १० दिवसात स्टॉकची किंमत ७० टक्क्यांनी वाढली आहे. ही कंपनी आहे द्रोणाचार्य एरिअल इनोव्हेशन्स (Droneacharya Aerial Innovations) 

स्टॉक मार्केटमध्ये जोरदार प्रिमियमसह लिस्ट झाल्यानंतर द्रोणाचार्य एरियल इनोव्हेशन्सचा शेअर रॉकेटच्या वेगानं कमाई करत आहे. कंपनीचा स्टॉक इशू प्राइजपेक्षा जवळपास २३८ टक्क्यांनी वाढून ट्रेडिंग करत आहे. गेल्या १० दिवसांची कामगिरी पाहायची झाली तर या शेअरनं ७० टक्के परतावा दिला आहे. यातच शेअरचा सर्किट फिल्डर ५ टक्क्यांनी वाढून १० टक्के करण्यात आला आहे. 

आमिर आणि रणबीरनं खरेदी केलेत शेअर
या कंपनीत आमिर खान आणि रणबीर कपूर यांनीही गुंतवणूक केली आहे. कंपनी BSE वर लिस्ट आहे. रिपोर्टनुसार, कंपनीचा आयपीओ येण्याआधीच दोन्ही अभिनेत्यांनी यात गुंतवणूक केली होती. DroneAcharya Aerial मध्ये आमिर खाननं २५ लाख रुपये गुंतवणूक करत ४६,६०० शेअर खरेदी केले आहेत. तर रणबीर कपूरनं २० लाख रुपयांमध्ये ३७,२०० शेअर्स खरेदी केले होते. दोन्ही कलाकारांसोबतच कंपनीत गुंतवणूक करणाऱ्या इतर गुंतवणुकदारांना शेअर ५३.५९ रुपयांच्या दरात मिळाला आहे. 

Web Title: droneacharya aerial innovations stocks continue upper circuit bollywood celebs aamir khan and ranbir kapoor invest money

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.