lokmat Supervote 2024
Lokmat Money >शेअर बाजार > ₹४३० च्या पार जाणार अदांनींच्या कंपनीचा शेअर; एक्सपर्ट बुलिश, म्हणाले...

₹४३० च्या पार जाणार अदांनींच्या कंपनीचा शेअर; एक्सपर्ट बुलिश, म्हणाले...

हा शेअर अनेक दिवसांपासून दबावाखाली होता. त्याच वेळी, ब्रोकरेज या शेअरवर आता बुलिश दिसत आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2024 01:48 PM2024-02-21T13:48:07+5:302024-02-21T13:50:18+5:30

हा शेअर अनेक दिवसांपासून दबावाखाली होता. त्याच वेळी, ब्रोकरेज या शेअरवर आता बुलिश दिसत आहेत.

Adanis group adani wilmar share share to cross rs 430 Experts are bullish said to buy | ₹४३० च्या पार जाणार अदांनींच्या कंपनीचा शेअर; एक्सपर्ट बुलिश, म्हणाले...

₹४३० च्या पार जाणार अदांनींच्या कंपनीचा शेअर; एक्सपर्ट बुलिश, म्हणाले...

अदानी समूहाच्या बहुतांश लिस्टेड कंपन्यांमधील बहुतांश शेअर्सची किंमत 500 रुपयांपेक्षा जास्त आहे. असेही काही शेअर्स आहेत ज्यांची किंमत 500 रुपयांपेक्षा कमी आहे. असाच एक अदानी समूहाचा शेअर म्हणजे अदानी विल्मर. हा शेअर अनेक दिवसांपासून दबावाखाली होता. त्याच वेळी, ब्रोकरेज या शेअरवर आता बुलिश दिसत आहेत.
 

काय म्हटलंय ब्रोकरेजनं?
 

एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ टेक रिसर्च ॲनालिस्ट नागराज शेट्टी यांनी अदानी विल्मरचे शेअर्स 358-369 रुपयांना खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. यासाठी 402-438 रुपयांची टार्गेट प्राईज देण्यात आलीये. त्याच वेळी, स्टॉप लॉस 345 रुपये निश्चित करण्यात आलाय. शेअरचा व्हॉल्युम आणि आरएसआय सकारात्मक संकेत देत आहेत.
 

अदानी विल्मरचे शेअर्स सध्या 360-370 रुपयांदरम्यान ट्रेड करत आहेत. 24 मे 2023 रोजी शेअरची किंमत 509.40 रुपयांवर पोहोचली होती. हा देखील शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांकी स्तर आहे. 20 नोव्हेंबर 2023 रोजी शेअरची किंमत 285.85 वर गेली, जो 52 आठवड्यांची नीचांकी स्तर आहे. कंपनीच्या शेअरहोल्डिंग पॅटर्नबद्दल बोलायचं झालं तर 87.87 टक्के हिस्सा प्रवर्तकाकडे आहे. त्याच वेळी, 12.13 टक्के हिस्सा पब्लिक शेअरहोल्डर्सकडे आहे.
 

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. यातील ब्रोकरेजची मतं त्यांची वैयक्तिक मतं आहेत. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: Adanis group adani wilmar share share to cross rs 430 Experts are bullish said to buy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.