Shubman Gill Net Worth: भारतीय कसोटी संघाचा कर्णधार झाल्यानंतर शुबमन गिल फॉर्ममध्ये दिसत आहे. गिल इंग्लंड दौऱ्यावर भरपूर धावा करून चर्चेत आहे. २५ वर्षीय गिल केवळ क्रिकेटच्या खेळपट्टीवर विक्रम प्रस्थापित करत नाहीये, तर कमाईच्या बाबतीतही तो सातत्यानं उंची गाठत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, शुबमन गिलची नेटवर्थ वर्ष २०२५ मध्ये जवळपास ३४ कोटींवर पोहोचली. शुबमन गिलनं क्रिकेट, ब्रँड एंडोर्समेंट आणि गुंतवणुकीच्या माध्यमातून प्रचंड संपत्ती गोळा केली आहे.
शुबमन गिलची मासिक कमाई ५० लाखांहून अधिक आहे, तर वार्षिक उत्पन्नाच्या बाबतीत ती ४ ते ७ कोटींच्या आसपास आहे. शुबमन गिलकडे अनेक महागड्या लक्झरी गाड्याही आहेत. शुबमन गिल आयपीएलमध्ये गुजरात टायटन्सकडून खेळतो. त्याला प्रत्येक सीझनसाठी १६.५ कोटी रुपये मिळतात. याशिवाय बीसीसीआयच्या ग्रेड-ए करारात त्याचा समावेश आहे. यातून त्याला वर्षाकाठी सात कोटी रुपये मिळतात. इतकंच नाही तर तो अनेक ब्रँड्सची जाहिरातही करतो आणि त्यातून तो मोठा पैसाही कमावतो.
६० पट सबस्क्रिप्शन, शेअर्स अलॉट झालेत का, कसं कराल चेक? GMP प्रीमिअमवर
घडवण्यात वडिलांचा मोठा वाटा
शुबमनला घडवण्यात सर्वात मोठं नाव म्हणजे त्याचे वडील लखविंदर सिंग. शुबमनला क्रिकेटपटू बनवायचं हे वडिलांनी लहानपणापासूनच ठरवलं होतं. शुबमननं चांगला सराव करावा यासाठी लखविंदर सिंग यांनी शेतातच खेळपट्टी तयार केली होती. पुढे लखविंदर सिंग हे गाव सोडून मोहालीत भाड्याच्या घरात राहू लागले आणि आपल्या मुलाला पीसीए अकादमीत दाखल केलं. प्रशिक्षक आणि मित्रांच्या म्हणण्यानुसार, अतिशय शांत स्वभावाचा शुबमन फलंदाजी करताना मात्र खूप आक्रमक होतो.
अनेक लक्झरी गाड्यांचं कलेक्शन
शुबमन गिलकडे अनेक आलिशान गाड्या आहेत. यामध्ये रेंज रोव्हर वेलार, मर्सिडीज बेंझ ई ३५० आणि महिंद्रा थार यांचा समावेश आहे. रेंज रोव्हर वेलार ही मिडसाइड एसयूव्ही आहे, तर मर्सिडीज-बेंझ ई ३५० ही आलिशान आणि आरामदायक कार आहे आणि महिंद्रा थार ही आनंद महिंद्रा यांनी दिलेली कार आहे.
शुबमन गिलचं नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं आहे. बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान, टीव्ही अभिनेत्री रिद्धिमा पंडित आणि अवनीत कौर यांना डेट करत असल्याच्या अफवा अनेकदा पसरल्या होत्या. मात्र, शुबमन गिलनं नेहमीच या बातम्या अफवा म्हणून फेटाळून लावल्या आहेत.