या वर्षी बँकांमध्ये नोकऱ्यांचा पाऊस

बँका चालू आर्थिक वर्षात सुमारे ५०,००० कर्मचाऱ्यांची भरती करणार आहेत. 

सरकारी बँका त्यांच्या वाढत्या कामकाजासाठी आणि विस्तारासाठी चालू आर्थिक वर्षात सुमारे ५०,००० कर्मचाऱ्यांची भरती करणार आहेत. 

यातले सुमारे २१,००० पदे अधिकारी वर्गासाठी, तर उर्वरित क्लर्क आणि इतर पदांसाठी असतील.

१२ सार्वजनिक क्षेत्रातील बँकांपैकी, सर्वांत मोठी कर्ज देणारी स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) या वर्षात विशेषज्ञ अधिकाऱ्यांसह २०,००० तरुणांची भरती करणार आहे. 

या भरतीची सुरुवात बँकेने आधीच करून, ५०५ प्रोबेशनरी ऑफिसर व १३,४५५ ज्युनियर असोसिएट्सची भरती केली. 

३५ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील रिक्त पदे भरण्यासाठी १३,४५५ ज्युनियर असोसिएट्सची भरती करण्याचा बँक विचार करतेय. 

मार्च २०२५ पर्यंत एसबीआयचे एकूण कर्मचारी २,३६,२२६ होते. मागील आर्थिक वर्षाच्या अखेरीस बँकेने १,१५,०६६ अधिकाऱ्यांना नोकरी दिली होती.

याशिवाय पीएनबीमध्ये ५,५००, सेंट्रल बँकेमध्ये ४ हजार आणि अन्य बँकांमध्ये मिळून एकूण ५० हजार जणांची एकूण भरती केली जाणार आहेय

१.७८ लाख कोटी इतका नफा आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये सरकारी बँकांनी मिळवला असून, हा ऐतिहासिक उच्चांक आहे.

Click Here