राकेश झुनझुनवालांच्या स्वप्नांचं 'उड्डाण' करणार Aviation क्षेत्रातील 'Big Bull'

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2021 12:18 PM2021-07-29T12:18:06+5:302021-07-29T12:23:35+5:30

Rakesh Jhunjhunwala New Airlines : नवीन एअरलाइन कंपनीसाठी ७० प्लेन खरेदी करण्याच्या तयारीत राकेश झुनझुनवाला. अकासा एअर नावाची कंपनी स्थापन करण्याच्या तयारीत झुनझुनवाला. 

share market big bull Rakesh Jhunjhunwalas Akasa Airlines Aditya Ghosh to join as co founder says Report | राकेश झुनझुनवालांच्या स्वप्नांचं 'उड्डाण' करणार Aviation क्षेत्रातील 'Big Bull'

राकेश झुनझुनवालांच्या स्वप्नांचं 'उड्डाण' करणार Aviation क्षेत्रातील 'Big Bull'

Next
ठळक मुद्देनवीन एअरलाइन कंपनीसाठी ७० प्लेन खरेदी करण्याच्या तयारीत राकेश झुनझुनवाला.अकासा एअर नावाची कंपनी स्थापन करण्याच्या तयारीत झुनझुनवाला. 

शेअर बाजारातील प्रसिद्ध गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala) हे लवकरच एका नवीन विमान कंपनीसाठी आपली ७० विमाने खरेदी करण्याची योजना आखत आहेत. ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार, राकेश झुनझुनवाला यांची पुढील चार वर्षांत ७० विमानांसह नवीन विमान कंपनी सुरू करण्याची इच्छा आहे. दरम्यान, भारतात जास्तीत जास्त लोकांनी विमान प्रवास करावा, असे शेअर बाजारातील दिग्गज राकेश झुनझुनवाला यांना वाटत असल्याचंही सांगितलं. एव्हिएशन क्षेत्रातील दिग्गज म्हणून ओळखले जाणारे इंडिगो एअरलाईन्सचे माजी अध्यक्ष आदित्य घओष या कंपनी को फाऊंडर म्हणून समील होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

झुनझुनवाला आणि जेट एअरवेजचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी विनय दुबे आकासा एअरलाईन्स नावानं नवी एअरलाईन्स सुरू करणार आहेत. तसंच याद्वारे घोष यांचं या क्षेत्रात पुनरागमन होणार असल्याचं इकॉनॉमिक टाईम्सनं सूत्रांच्या हवाल्यानं म्हटलं आहे. घोष २०१८ मध्ये इंडिगोमधून बाहेर पडले होते. ते १० वर्षांपर्यंत कंपनीचे प्रेसिडेंट आणि पूर्णवेळ डायरेक्टर म्हणून कार्यरत होते. पेशानं वकील असलेले घोष २००८ मध्ये इंडिगोशी जोडले गेले आणि देशातील सर्वात मोठी एअरलाईन्स कंपनी बनवण्यात त्यांनी मोलाची भूमिका निभावली. 

जेव्हा घोष यांनी कंपनी सोडण्याचा निर्णय घेतला तेव्हा इंडिगोच्या ताफ्यात १६० विमानं, १००० पेक्षा अधिक रोज उड्डाणं आमि ५५ हजार कोटी रूपयांचा मार्केट कॅप होता. बुधवारी बाजार बंद होईपर्यंत हे मार्केट कॅप ६४,१६८ कोटी रूपयांपर्यंत गेलं होतं. 

कोणाचा किती हिस्सा?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार घोष यांचा नव्या एअरलाईन्समध्ये १० टक्के हिस्सा असेल. तसंच झुनझुनवाला यांच्या नॉमिनीद्वारे ते बोर्ड मेंबरही असतील. परंतु ते मॅनेजमेंटचा भाग नसतील. परंतु त्यांचं पूर्ण लक्ष या व्हेंचरवर असेल. या एअरलाईन्समध्ये झुनझुनवाला यांचा ४० टक्के हिस्सा असेल. तसंच दुबे यांचा १५ टक्क्यांपेक्षा अधिक हिस्सा असेल. तर दुसरीकडे अमेरिकेच्या Par Capital Management आणि होमस्टे अॅग्रीगेटर Airbnb देखील यात गुंतवणूक करणार आहेत.

लवकरच मिळू शकते एनओसी
ब्लूमबर्ग टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत राकेश झुनझुनवाला म्हणाले की, नवीन विमान कंपनीत जवळपास ३.५ कोटी डॉलर्सची गुंतवणूक करण्याचा विचार आहे. या गुंतवणूकीच्या माध्यमातून विमान कंपनीत ४० टक्के हिस्सा घेण्याची योजना आहे. येत्या १५ किंवा २० दिवसांत भारतीय उड्डाण मंत्रालयाकडून एनओसी मिळू शकेल, असे त्यांनी सांगितले.

 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: share market big bull Rakesh Jhunjhunwalas Akasa Airlines Aditya Ghosh to join as co founder says Report

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app