lokmat Supervote 2024
Lokmat Money >गुंतवणूक > २५० महिने वाचवा ₹१००, जमतील १ कोटी १६ लाख; अशी काम करेल SIPची ही सॉलेड ट्रिक

२५० महिने वाचवा ₹१००, जमतील १ कोटी १६ लाख; अशी काम करेल SIPची ही सॉलेड ट्रिक

हल्ली अनेक जण भविष्याच्या दृष्टीनं गुंतवणूक करण्यासाठी पुढाकार घेऊ लागले आहेत. आपलं लक्ष्य गाठण्यासाठी कुठे आणि किती गुंतवणूक करावी हे समजून घेणं महत्त्वाचं आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2024 02:12 PM2024-03-18T14:12:37+5:302024-03-18T14:14:35+5:30

हल्ली अनेक जण भविष्याच्या दृष्टीनं गुंतवणूक करण्यासाठी पुढाकार घेऊ लागले आहेत. आपलं लक्ष्य गाठण्यासाठी कुठे आणि किती गुंतवणूक करावी हे समजून घेणं महत्त्वाचं आहे.

Save rs 100 per day for 250 months get rs 1 6 crore This solid trick of SIP will do the job investment tips | २५० महिने वाचवा ₹१००, जमतील १ कोटी १६ लाख; अशी काम करेल SIPची ही सॉलेड ट्रिक

२५० महिने वाचवा ₹१००, जमतील १ कोटी १६ लाख; अशी काम करेल SIPची ही सॉलेड ट्रिक

Mutual Funds SIP Calculation: बचत केवळ १०० रुपये आणि कमाई कोट्यवधींमध्ये... हल्ली अनेक जण भविष्याच्या दृष्टीनं गुंतवणूक करण्यासाठी पुढाकार घेऊ लागले आहेत. आपलं लक्ष्य गाठण्यासाठी कुठे आणि किती गुंतवणूक करावी हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. जर तुम्ही योग्य रणनीतीनं काम केलं तर तुम्ही निश्चितच वेळेत कोट्यधीस व्हाल. गुंतवणुकीसोबतच त्याच्याशी वयही जुळणं महत्त्वाचं आहे. कोट्यधीश होण्यासाठी कोणताही शॉर्टकट नाही. पण, पैशातून पैसे कमवण्याचा एक मार्ग आहे. तुम्ही म्युच्युअल फंडाच्या SIP बाबत तर नक्कीच ऐकलं असेल, आता कॅलक्युलेशनही समजून घ्या.
 

छोट्या रकमेपासून गुंतवणूक
 

गुंतवणुकीसाठी मोठ्या रकमेची गरज नाही. छोट्या रकमेतूनही मोठा फंड तयार करता येतो. दर महिन्याला तुम्हाला रोज किती पैसे वाचवायचे ते निवडावं लागेल आणि नियमितपणे गुंतवणूक करावी लागेल. म्युच्युअल फंड चांगले असतात हे तुम्ही अनेकदा जाहिरातींमध्ये पाहिले असेल. परंतु तुम्ही त्यात किती नियमितपणे गुंतवणूक करता यावरही ते अवलंबून असतं. तुम्ही रोज १०० रुपये वाचवूनही १ कोटी रुपयांपर्यंतचा प्रवास करू शकता. यासाठी एक ट्रिक वापरावी लागेल.
 

केवळ १०० रुपये वाचवा
 

सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनद्वारे (SIP) म्युच्युअल फंडात दरमहा ३००० रुपये गुंतवा. यासाठी तुम्हाला दररोज फक्त १०० रुपये वाचवावे लागतील. हे पैसे २१ वर्षांसाठी गुंतवा. म्हणजे तुम्हाला एकूण २५० महिन्यांसाठी मासिक गुंतवणूक करावी लागेल. म्युच्युअल फंडांनी दीर्घ मुदतीत जोरदार परतावा दिला आहे. असे बरेच फंड आहेत ज्यांनी २० टक्क्यांपर्यंत परतावा दिला आहे आणि पुढील कमाईसाठी बरेच चांगले दिसतात. 
 

दैनंदिन १०० रुपयांची बचत म्हणजेच दरमहा ३००० रुपये गुंतवावे लागतील. ही गुंतवणूक म्युच्युअल फंडातील एसआयपीद्वारे केली जाईल. २०% वार्षिक परताव्यानुसार, तुमच्याकडे २१ वर्षांत १,१६,०५,३८८ रुपये असतील. दरम्यान, २१ वर्षांमध्ये तुम्ही फक्त ७,५६,००० रुपये गुंतवले असतील. तुम्ही उर्वरित १,०८,४९,३८८ रुपयांचं वेल्थ गेन आहे. म्हणजे कंपाउंडिंगमुळे इथे प्रचंड फायदा झाला आहे.

 

 

महागाईनुसार त्याचं मूल्य किती असेल?
 

लक्षात ठेवा की ही कॅलक्युलेशन केवळ अंदाज म्हणून केलं गेलं आहे. २१ वर्षांच्या महागाईवरही नजर टाकली तर आकडेवारी वेगळी असेल. समजा तुम्ही ३००० रुपयांनी गुंतवणूक करायला सुरुवात केली आणि २० टक्के वार्षिक परतावा मिळाला, तर तुमच्याकडे ४५,७७,६४७ रुपये असतील. गुंतवणुकीची रक्कम ७,५६,००० रुपये इतकीच राहील आणि संपत्तीतील वाढ ३८,२१,६४७ रुपये असेल. येथे वार्षिक महागाईचा दर ६% इतका घेतला आहे. यामुळे तुमच्या गुंतवणुकीची रक्कम अॅडजस्ट करण्यात आलीये.

(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील तज्ज्ञांचा किंवा जाणकारांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: Save rs 100 per day for 250 months get rs 1 6 crore This solid trick of SIP will do the job investment tips

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.