post office fd : शेअर मार्केटमध्ये सुरू असलेली घसरण पाहून अनेक गुंतवणूकदार आता पारंपरिक पर्यांकडे वळत आहेत. सरकार आणि बँका अशा अनेक योजना राबवत असतात, जिथे तुम्ही गुंतवणूक करुन चांगला निधी जमा करू शकता. यात मुदत ठेव (एफडी) योजना लोकप्रिय आहेत. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे एफडीमध्ये गुंतवलेले पैसे सुरक्षित राहतात. याशिवाय एफडीमध्ये मिळणारे रिटर्नही निश्चित असतात. यामुळेच जेव्हा जेव्हा गुंतवणुकीचा प्रश्न येतो तेव्हा लोक पैशाची एफडी करतात.
बँकांसोबतच पोस्ट ऑफिसद्वारेही एफडी योजना ऑफर केल्या जातात. यामध्ये तुम्ही तुमचे पैसे अतिशय सुरक्षितपणे गुंतवू शकता. पोस्ट ऑफिस एफडीमध्ये गुंतवणूक करून तुम्ही लाखो रुपयांचा नफा मिळवू शकता.
पोस्ट ऑफिस एफडी
तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये वेगवेगळ्या कालावधीच्या FD मध्ये गुंतवणूक करू शकता. यामध्ये तुम्ही १ वर्ष, २ वर्षे, ३ वर्षे आणि ५ वर्षांच्या कालावधीसह FD मध्ये गुंतवणूक करू शकता. पोस्ट ऑफिस १ वर्षाच्या मुदतीच्या FD मध्ये ६.७ टक्के, २ वर्षांच्या FD मध्ये ७ टक्के, ३ वर्षांच्या FD मध्ये ७.१ टक्के आणि 5 वर्षांच्या मुदतीच्या FD मध्ये ७.५ टक्के परतावा.
पोस्ट ऑफिसमध्ये एफडी खाते कसे उघडायचे?
पोस्ट ऑफिसमध्ये फिक्स डिपॉझिट खाते उघडायचे असेल तर ही प्रक्रिया खूप सोपी आहे. तुम्ही तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिसला भेट देऊन किंवा घरबसल्या ऑनलाइन अर्ज करू शकता. जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जा आणि एफडी खाते उघडण्याचा फॉर्म घेऊन भरुन द्या. यासोबत आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट आकाराचे फोटो आणि राहण्याचा पुरावा यांसारखी आवश्यक कागदपत्रे जोडून द्या. गुंतवणूकीची किमान रक्कम जमा करा. फॉर्म जमा केल्यानंतर, तुम्हाला FD प्रमाणपत्र मिळेल.
पोस्ट ऑफिस एफडी नियम
- किमान गुंतवणूक : १००० रुपयांपासून सुरू करा आणि कमाल मर्यादा नाही.
- कार्यकाळ: १ वर्ष, २ वर्षे, ३ वर्षे आणि ५ वर्षांसाठी गुंतवणूक केली जाऊ शकते.
- कर लाभ : ५ वर्षांची FD केल्यास, कलम ८०C अंतर्गत कर सूट मिळते.
- मुदतपूर्व पैसे काढणे : तुम्ही तुमची FD मुदतीपूर्वी काढल्यास, तुम्हाला काही दंड भरावा लागेल.