Lokmat Money > बिझनेस न्यूज > पीएम किसान सन्मान निधीच्या २०व्या हप्त्यापूर्वी मोठा बदल; 'या' शेतकऱ्यांना होणार फायदा

पीएम किसान सन्मान निधीच्या २०व्या हप्त्यापूर्वी मोठा बदल; 'या' शेतकऱ्यांना होणार फायदा

pm kisan samman nidhi : शेतकरी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या २० व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. याआधी केंद्र सरकारने शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2025 11:18 IST2025-05-06T10:45:37+5:302025-05-06T11:18:51+5:30

pm kisan samman nidhi : शेतकरी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या २० व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. याआधी केंद्र सरकारने शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे.

pm kisan samman nidhi 20th installment now the nodal officer will solve the problem | पीएम किसान सन्मान निधीच्या २०व्या हप्त्यापूर्वी मोठा बदल; 'या' शेतकऱ्यांना होणार फायदा

पीएम किसान सन्मान निधीच्या २०व्या हप्त्यापूर्वी मोठा बदल; 'या' शेतकऱ्यांना होणार फायदा

pm kisan samman nidhi : देशभरातील कोट्यवधी शेतकरी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या २०व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी ही योजना आर्थिक मदतीचा स्रोत आहे. या योजनेअंतर्गत, वर्षभरात ६००० हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. यामध्ये प्रत्येक २ महिन्यानंतर २००० प्रति हप्त्या शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात जमा केला जातो. आता शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सरकारने या योजनेत मोठा बदल केला आहे.

पीएम किसानच्या २० व्या हप्त्यापूर्वी मोठा बदल
अनेक शेतकऱ्यांना काही तांत्रिक किंवा इतर कारणांमुळे पीएम किसान निधीचा हप्ता मिळण्यास अडचण येते. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना बँक किंवा सायबर कॅफेवाल्यांकडे हेलपाटे मारावे लागतात. ही समस्या दूर करण्यासाठी सरकारने मोठं पाऊल उचललं आहे. सरकारने जिल्हा पातळीवर नोडल अधिकारी नियुक्त केले आहेत, त्यामुळे तुम्हाला शेतकऱ्यांना इकडे तिकडे भटकावे लागणार नाही. ज्यामध्ये तुम्ही नोडल अधिकाऱ्यांच्या मोबाईल नंबर किंवा ईमेलवर देखील तक्रार करू शकता. या बदलामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल. कारण त्यांना आता नोडल ऑफिसरच्या मदतीने त्यांच्या सर्व समस्यांवर उपाय मिळतील.

नोडल अधिकाऱ्यांशी संपर्क कसा साधावा?
तुमच्या क्षेत्रातील नोडल अधिकाऱ्याचा संपर्क क्रमांक किंवा ईमेल आयडी जाणून घेण्यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही. तुम्ही घरबसल्या ही माहिती मिळवू शकता.

  • सर्वप्रथम पीएम किसान सन्मान निधीच्या अधिकृत वेबसाइट www.pmkisan.gov.in वर जा.
  • यानंतर, फार्मर कॉर्नरवर जा आणि सर्च युवर पॉइंटच्या संपर्क पर्यायावर जा.
  • तुम्हाला राज्य नोडल अधिकारी आणि जिल्हा नोडल अधिकाऱ्यांची माहिती मिळेल. तुम्ही कोणाशीही संपर्क साधू शकता.

पीएम किसानचा २० वा हप्ता कधी येणार?
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा २० वा हप्ता जून २०२५ मध्ये जारी केला जाऊ शकतो. याआधी, योजनेचा १९ वा हप्ता २४ फेब्रुवारी २०२५ रोजी जारी करण्यात आला होता. यामध्ये ९.८ कोटींहून अधिक शेतकऱ्यांना फायदा झाला. लाभार्थ्यांमध्ये २.४ कोटी महिला शेतकऱ्यांचाही समावेश होता.

वाचा - PNB मध्ये १ लाख रुपये जमा करा, मिळेल ₹१६,२५० चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीम डिटेल्स

पीएम किसानची ई-केवायसी प्रक्रिया
ज्या शेतकऱ्यांनी अद्याप पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेसाठी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. त्यांच्यासाठी सरकारने ही प्रक्रिया सोपी करण्याचा निर्णय घेतला आहे.

Web Title: pm kisan samman nidhi 20th installment now the nodal officer will solve the problem

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.