Lokmat Money > बिझनेस न्यूज > महिलांना पुरुषांपेक्षा १६ टक्के कमी वेतन

महिलांना पुरुषांपेक्षा १६ टक्के कमी वेतन

जागतिक पातळीवरही महिलांना पुरुषांच्या तुलनेत सरासरी कमी वेतन मिळते.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2018 01:15 AM2018-04-28T01:15:59+5:302018-04-28T01:15:59+5:30

जागतिक पातळीवरही महिलांना पुरुषांच्या तुलनेत सरासरी कमी वेतन मिळते.

Women pay 16 percent less salary than men | महिलांना पुरुषांपेक्षा १६ टक्के कमी वेतन

महिलांना पुरुषांपेक्षा १६ टक्के कमी वेतन

नवी दिल्ली : भारतात महिलांना पुरुषांच्या तुलनेत सरासरी १६.१ टक्के कमी वेतन मिळते. जागतिक पातळीवरही महिलांच्या बाबतीत हीच स्थिती आहे.
‘कोर्न फेरी जेंडर पे इंडेक्स’मध्ये ही माहिती देण्यात आली आहे. जागतिक पातळीवरही महिलांना पुरुषांच्या तुलनेत सरासरी कमी वेतन मिळते. मात्र, समान रोजगार, समान कंपनी आणि समान काम या पातळीवर विश्लेषण केल्यास महिला व पुरुषांमधील वेतनाची तफावत खूपच कमी होते, असे कोर्न फेरीच्या अहवालात म्हटले आहे.
जागतिक पातळीवर एकाच कंपनीत काम करणाऱ्या महिला व पुरुषांच्या वेतनात १.५ टक्क्यांची तफावत आहे. एकाच कंपनीत आणि समान काम करताना, ही तफावत आणखी कमी होऊन 0.५ टक्केच राहते.
५३ देशांचा अभ्यास
जगभरातील १२.३ दशलक्ष कर्मचारी, १४,२८४ कंपन्या आणि ५३ देशांत अभ्यास करून ‘कोर्न फेरी’ने हा निर्देशांक तयार केला आहे. कोर्न फेरीचे बक्षिसी व लाभ समाधान विभागाचे प्रमुख बॉब वेसेलकॅम्पर यांनी सांगितले की, काही कंपन्या वेतनाच्या बाबतीत महिलांशी अजूनही दुजाभाव करताना दिसतात.

Web Title: Women pay 16 percent less salary than men

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :jobनोकरी