Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > मोबाइल रिचार्ज होणार स्वस्त? ‘ट्राय’ कठोर; सूचनांसाठी मुदतवाढ, फक्त कॉलिंगसाठी येणार प्लॅन

मोबाइल रिचार्ज होणार स्वस्त? ‘ट्राय’ कठोर; सूचनांसाठी मुदतवाढ, फक्त कॉलिंगसाठी येणार प्लॅन

टेलिकॉम कंपन्यांनी ग्राहकांसाठी फक्त कॉलिंग आणि एसएमएस असलेले परवडणारे प्लॅन आणणे बंधनकारक असेल.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2026 10:19 IST2026-04-30T10:18:50+5:302026-04-30T10:19:23+5:30

टेलिकॉम कंपन्यांनी ग्राहकांसाठी फक्त कॉलिंग आणि एसएमएस असलेले परवडणारे प्लॅन आणणे बंधनकारक असेल.

Will mobile recharge be cheaper? TRAI strict; Extension of deadline for notifications, plans will come only for calling | मोबाइल रिचार्ज होणार स्वस्त? ‘ट्राय’ कठोर; सूचनांसाठी मुदतवाढ, फक्त कॉलिंगसाठी येणार प्लॅन

मोबाइल रिचार्ज होणार स्वस्त? ‘ट्राय’ कठोर; सूचनांसाठी मुदतवाढ, फक्त कॉलिंगसाठी येणार प्लॅन

नवी दिल्ली - ज्या ग्राहकांना इंटरनेटची गरज नाही, त्यांना केवळ कॉलिंग आणि एसएमएससाठी महागडे रिचार्ज का करावे लागतात? या प्रश्नावर आता भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) कठोर पाऊल उचलण्याचे संकेत दिले आहेत. 

केवळ व्हॉईस कॉलिंग आणि एसएमएस सेवा देणारे स्वस्त प्लॅन कंपन्यांनी अनिवार्य उपलब्ध करून द्यावेत, असा प्रस्ताव ‘ट्राय’ने मांडला असून, त्यावर हरकती व सूचना नोंदवण्यासाठी आता ५ मे २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

नेमके प्रकरण काय?
सध्या बहुतांश रिचार्ज प्लॅन हे डेटा (इंटरनेट) सेवांशी जोडलेले असतात. ज्यांना इंटरनेट नको आहे, त्यांनाही विनाकारण डेटाचे पैसे मोजावे लागतात. ट्रायने यापूर्वी कंपन्यांना असे प्लॅन आणण्यास सांगितले होते, मात्र कंपन्यांनी त्या प्लॅन्सचे दर अवाजवी ठेवले.

परवडणारे प्लॅन आणणे कंपन्यांना बंधनकारक 
टेलिकॉम कंपन्यांनी ग्राहकांसाठी फक्त कॉलिंग आणि एसएमएस असलेले परवडणारे प्लॅन आणणे बंधनकारक असेल. यामुळे अनेकांचा फायदा होईल.
डेटा सेवा नसलेल्या प्लॅन्सचे दर त्या प्रमाणात कमी असावेत, जेणेकरून सामान्य ग्राहकाचा खिसा कापला जाणार नाही. आता ५ मेपर्यंत कोणालाही यावर आपली मते मांडता येतील. या निर्णयाचा सर्वाधिक फायदा ज्येष्ठ नागरिक, ग्रामीण भागातील जनता आणि केवळ कामापुरता फोन वापरणाऱ्या ग्राहकांना होणार आहे. 

Web Title : मोबाइल रिचार्ज होगा सस्ता? ट्राई सख्त; समय सीमा बढ़ी

Web Summary : ट्राई ने किफायती वॉयस और एसएमएस प्लान का प्रस्ताव रखा है, जिससे महंगे डेटा वाले रिचार्ज से राहत मिलेगी। प्रतिक्रिया की समय सीमा 5 मई, 2026 तक बढ़ाई गई। वरिष्ठ नागरिकों और ग्रामीण उपयोगकर्ताओं को लाभ।

Web Title : Mobile Recharge to Get Cheaper? TRAI Strict; Deadline Extended

Web Summary : TRAI proposes affordable voice and SMS plans, addressing costly data-bundled recharges. Deadline for feedback extended to May 5, 2026. Benefits seniors and rural users.