lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > व्याजदर वाढल्यानं घरांच्या मागणीवरही होणार का परिणाम? पाहा काय म्हणतायत एक्सपर्ट्स

व्याजदर वाढल्यानं घरांच्या मागणीवरही होणार का परिणाम? पाहा काय म्हणतायत एक्सपर्ट्स

RBI ने ८ फेब्रुवारी रोजी रेपो दरात वाढ केल्यानंतर गृहकर्जाचा व्याजदर वाढणार आहे. गृहकर्ज घेणारे त्यांचा ईएमआय किती वाढेल याच्या टेन्शनमध्ये आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2023 08:32 PM2023-02-10T20:32:37+5:302023-02-10T20:32:57+5:30

RBI ने ८ फेब्रुवारी रोजी रेपो दरात वाढ केल्यानंतर गृहकर्जाचा व्याजदर वाढणार आहे. गृहकर्ज घेणारे त्यांचा ईएमआय किती वाढेल याच्या टेन्शनमध्ये आहेत.

Will increase in interest rate affect housing demand See what the experts say rbi repo rate increase | व्याजदर वाढल्यानं घरांच्या मागणीवरही होणार का परिणाम? पाहा काय म्हणतायत एक्सपर्ट्स

व्याजदर वाढल्यानं घरांच्या मागणीवरही होणार का परिणाम? पाहा काय म्हणतायत एक्सपर्ट्स

RBI ने ८ फेब्रुवारी रोजी रेपो दरात वाढ केल्यानंतर गृहकर्जाचा व्याजदर वाढणार आहे. गृहकर्ज घेणारे त्यांचा ईएमआय किती वाढेल याच्या टेन्शनमध्ये आहेत. तज्ञांचे म्हणण्यानुसार ईएमआयमध्ये २-४ टक्क्यांची वाढ होऊ शकते. ज्यांचे गृहकर्ज रेपो रेटसारख्या कोणत्याही एक्स्टर्नल बेंचमार्कशी लिंक्ड आहे त्यांच्यावर अधिक परिणाम होणार आहे. साधारणपणे, रेपो रेट वाढल्यानंतर बँकांसाठी फंडची कॉस्ट वाढते. RBI कडून कर्ज घेण्यासाठी त्यांना जास्त व्याज द्यावे लागते. याचा बोजा ते नवीन आणि जुन्या गृहकर्ज ग्राहकांवर टाकतात.

अँड्रोमेडा सेल्स आणि Apnapaisa.com चे कार्यकारी अध्यक्ष व्ही स्वामिनाथन म्हणाले की, “रेपो दरात २५ बेसिस पॉईंट्सच्या वाढीनंतर ईएमआय २ ते ४ टक्क्यांनी वाढू शकतात. ९.२५ टक्के व्याजदरासह ७० लाख रुपयांच्या २० वर्षांच्या गृहकर्जासाठी, आतापर्यंत EMI ६४,१११ रुपये होता. ०.२५ टक्क्यांच्या वाढीनंतर, व्याजदर ९.५० टक्के होईल. त्यामुळे ईएमआय ६५,२४९ रुपयांपर्यंत वाढेल. दरमहा १,१३८ रुपयांचा अधिक ईएमआय म्हणून भरावे लागतील.”

मे महिन्यानंतर इतका वाढला ईएमआय
"गेल्या तीन तिमाहीत रेपो दरात २.५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. यामुळे, ७० लाख रुपयांच्या २० वर्षांच्या गृहकर्जाचा व्याजदर, जो गेल्या वर्षी मे महिन्यात ७ टक्के होता, तो आता ९.५ टक्क्यांपर्यंत वाढला आहे. त्यावेळी तुम्हाला ईएमाय म्हणून ५४,२७१ रुपये भरावे लागत होते. ते आता वाढून ६५,२४९ रुपये झाला आहे. अशाप्रकारे, ग्राहकाला दरमहा १०,९७८ रुपये अतिरिक्त भरावे लागतील. 

काय आहे पर्याय?
गृहकर्ज घेणाऱ्यांनी व्याज वाढू नये म्हणून प्रीपेमेंटचा विचार करावा. यामुळे त्यांना कर्जाचा कालावधी आणि ईएमआय नियंत्रणात ठेवण्यास मदत होईल. त्याला दोन पर्याय आहेत. प्रथम, त्यांना प्रीपेमेंटसाठी पैशांची व्यवस्था करावी लागेल. दुसरे, त्यांना त्यांच्या गृहकर्जाचा कालावधी वाढवावा लागेल. जर त्यांनी कोणतेही पाऊल उचलले नाही, तर त्यांचा EMI वाढेल.

मागणीवर परिणाम होणार का?
व्याजदरात वाढ झाल्याने गृहनिर्माण क्षेत्रावर मर्यादित परिणाम झाला आहे. नाइट फ्रँक अफोर्डेबलिटी इंडेक्समध्ये गेल्या वर्षभरात सरासरी १.४ टक्क्यांनी घसरण झाली आहे. गेल्या वर्षी गृहकर्जाची मागणी जोरदार होती. डिसेंबर २०२२ मध्ये त्याची वाढ १६ टक्के नोंदवण्यात आली आहे. त्यामुळे पुढील आर्थिक वर्षात ग्राहकांच्या सेंटिंमेंटवर विपरित परिणाम होणार नाही, असा विश्वास नाइट फ्रँकने व्यक्त केला.

Web Title: Will increase in interest rate affect housing demand See what the experts say rbi repo rate increase

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.