Lokmat Money > बिझनेस न्यूज > Anil Ambani : अनिल अंबानी अडचणीत? घरासह इतरही ठिकाणांवर सकाळपासूनच छापे; १७००० कोटींच्या बँक कर्ज घोटाळाप्रकरणी CBI ची कारवाई!

Anil Ambani : अनिल अंबानी अडचणीत? घरासह इतरही ठिकाणांवर सकाळपासूनच छापे; १७००० कोटींच्या बँक कर्ज घोटाळाप्रकरणी CBI ची कारवाई!

कफ परेड सीविंड येथील त्यांच्या घरी सकाळीच सात ते आठ वाजण्याच्या सुमारास काही अधिकारी पोहोचले. तेव्हापासून त्यांच्या घराची तपासणी अथवा झाडाझडती सुरू आहे. अनिल अंबानी आणि त्यांचे कुटुंबही घरातच आहे. यापूर्वी ईडीने अनिल अंबानी यांची चौकशी केली होती. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2025 12:55 IST2025-08-23T12:53:41+5:302025-08-23T12:55:05+5:30

कफ परेड सीविंड येथील त्यांच्या घरी सकाळीच सात ते आठ वाजण्याच्या सुमारास काही अधिकारी पोहोचले. तेव्हापासून त्यांच्या घराची तपासणी अथवा झाडाझडती सुरू आहे. अनिल अंबानी आणि त्यांचे कुटुंबही घरातच आहे. यापूर्वी ईडीने अनिल अंबानी यांची चौकशी केली होती. 

Will Anil Ambani's problems increase Raids on his house and other places since morning CBI action in 17000cr bank loan fraud case | Anil Ambani : अनिल अंबानी अडचणीत? घरासह इतरही ठिकाणांवर सकाळपासूनच छापे; १७००० कोटींच्या बँक कर्ज घोटाळाप्रकरणी CBI ची कारवाई!

Anil Ambani : अनिल अंबानी अडचणीत? घरासह इतरही ठिकाणांवर सकाळपासूनच छापे; १७००० कोटींच्या बँक कर्ज घोटाळाप्रकरणी CBI ची कारवाई!

अनिल अंबानींची अडचण वाढताना दिसत आहे. ईडी चौकशीनंतर, आता सीबीआयने १७००० कोटी रुपयांच्या बँक फसवणूक प्रकरणात अनिल अंबानींशी संबंधित ठिकानांवर झाडाझडतीला सुरुवात केली आहे. सीबीआयने सकाळी सुमारे 7 वाजल्यापासूनच अनिल अंबानींच्या घरावर छापेमारी सुरू केली आहे. सीबीआयचे 7 ते 8 अधिकारी सकाळी सुमारे 7 वाजल्यापासूनच त्यांच्या घराची तपासणी करत आहेत. दरम्यान अनलि अंबानी आपल्या कुटुंबासह घरातच उपस्थित आहेत.

कफ परेड सीविंड येथील त्यांच्या घरी सकाळीच सात ते आठ वाजण्याच्या सुमारास काही अधिकारी पोहोचले. तेव्हापासून त्यांच्या घराची तपासणी अथवा झाडाझडती सुरू आहे. अनिल अंबानी आणि त्यांचे कुटुंबही घरातच आहे. यापूर्वी ईडीने अनिल अंबानी यांची चौकशी केली होती. 

सीबीआयने दाखल केला होता एफआयआर - 
या छापेमारीपूर्वी CBI ने दोन एफआयआर दाखल केले होते. यानंतर, ईडीने अनिल अंबानींच्या ठिकाणांवर छापा टाकला होता. यानंतर आता, सीबीआयही तपास करत आहे. हा छापा १७००० कोटी रुपयांच्या कथित बँक कर्ज घोटाळ्यासंदर्भात आहे. जे आर्थिक वर्ष 2017 ते 2019 दरम्यान यस बँकेने अनिल अंबानींच्या कंपन्यांना बेकायदेशीरपणे कर्जाच्या स्वरुपात ट्रांसफर केले होते.

ईडीनंही केली होती चौकशी -  
तत्पूर्वी, ED ने रिलायन्स ग्रुपचे चेअरमन तथा एमडी अनिल अंबानी यांना, कथित ₹17000 कोटी रुपयांच्या कर्ज घोटाळाप्रकरणी सुरू असलेल्या चौकशीच्या पार्श्वभूमीवर चौकशीसाठी बोलावले होते. यापूर्वी, ईडीने देखील अनिल अंबानींशी संबंधित व्यावसायिक संस्थांवर छापे टाकले होते. तेव्हा रिलायन्स समूहाशी संबंधित 50 व्यावसायिक संस्था आणि 25 व्यक्तींच्या ठिकाणांवर छापे टाकण्यात आले होते. हे छापे 24 जुलैरोजी मुंबईत किमान 35 ठिकाणांवर टाकण्यात आले होते. 

ईडी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिल अंबानी यांच्या कंपन्यांना कर्ज देण्याच्या बरोबर आधीच, येस बँकेच्या प्रवर्तकांना त्यांच्या व्यवसायात मोठी रक्कम मिळाली होती. या संदर्भात लाच आणि दोघांमधील संबंधांची चौकशी सुरू आहे.

Web Title: Will Anil Ambani's problems increase Raids on his house and other places since morning CBI action in 17000cr bank loan fraud case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.