Lokmat Money > बिझनेस न्यूज > आरोग्य विमा आणि गंभीर आजार विम्यात काय आहे फरक? अनेकजण इन्शुरन्स घेताना करतात चूक!

आरोग्य विमा आणि गंभीर आजार विम्यात काय आहे फरक? अनेकजण इन्शुरन्स घेताना करतात चूक!

Health Insurance : अनेकजण आरोग्य विमा आणि गंभीर आजाराच्या पॉलिसीला एकच समजतात. मात्र, या दोन्हीमध्ये मोठा फरक आहे. या दोन्ही पॉलिसी प्रत्येकासाठी आवश्यक आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2025 15:24 IST2025-08-21T15:12:59+5:302025-08-21T15:24:30+5:30

Health Insurance : अनेकजण आरोग्य विमा आणि गंभीर आजाराच्या पॉलिसीला एकच समजतात. मात्र, या दोन्हीमध्ये मोठा फरक आहे. या दोन्ही पॉलिसी प्रत्येकासाठी आवश्यक आहेत.

Why You Need Both Health and Critical Illness Insurance for Financial Security | आरोग्य विमा आणि गंभीर आजार विम्यात काय आहे फरक? अनेकजण इन्शुरन्स घेताना करतात चूक!

आरोग्य विमा आणि गंभीर आजार विम्यात काय आहे फरक? अनेकजण इन्शुरन्स घेताना करतात चूक!

Health Insurance : आजच्या काळात आरोग्य विमा असणे अत्यंत महत्त्वाचे आहे, पण अनेक लोकांना आरोग्य विमा आणि गंभीर आजार विमा यातील फरक स्पष्ट नसतो. या दोन्ही पॉलिसी वेगवेगळ्या गरजा पूर्ण करतात. म्हणूनच, आपल्या आणि कुटुंबाच्या आर्थिक भविष्यासाठी या दोन्ही विमा पॉलिसी असणे आवश्यक आहे. तुमच्याकडे आरोग्य विमा असेल किंवा विमा खरेदी करण्याचा विचार करत असाल तर यातील फरक समजून घेणे आवश्यक आहे.

कव्हरेजमधील फरक
हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी रुग्णालयातील भरती आणि ओपीडीच्या खर्चांना कव्हर करते. ही पॉलिसी तुमच्या उपचारांवर होणाऱ्या खर्चाची भरपाई करते. याउलट, क्रिटिकल इलनेस इन्शुरन्स पॉलिसी गंभीर आजाराचे निदान झाल्यावर एकरकमी मोठी रक्कम देते. एसबीआय जनरल इन्शुरन्सच्या मते, कर्करोग, शेवटच्या टप्प्यातील किडनी निकामी होणे, मल्टिपल स्क्लेरोसिस आणि स्ट्रोक यांसारख्या गंभीर आजारांसाठी ही पॉलिसी अत्यंत गरजेची आहे.

प्रीमियम आणि दावा करण्याची पद्धत
हेल्थ इन्शुरन्सचा प्रीमियम सामान्यतः क्रिटिकल इलनेस पॉलिसीपेक्षा जास्त असतो. कारण हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीमध्ये तुम्ही अनेकदा आणि वेगवेगळ्या आजारांसाठी किंवा अपघातात जखमी झाल्यास दावा करू शकता. याउलट, क्रिटिकल इलनेस पॉलिसीमध्ये तुम्ही तुमच्या आयुष्यात फक्त एकदाच दावा करू शकता.

नॉन-मेडिकल खर्चांसाठी उपयुक्त
हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी फक्त हॉस्पिटलमधील खर्चांना कव्हर करते. मात्र, क्रिटिकल इलनेस इन्शुरन्समध्ये मिळणारी एकरकमी रक्कम तुम्ही कोणत्याही कामासाठी वापरू शकता. गंभीर आजारामुळे तुमची कमाई थांबते, अशावेळी तुम्ही ही रक्कम घराचे खर्च चालवण्यासाठी, कर्ज फेडण्यासाठी किंवा इतर वैद्यकीय नसलेल्या गरजा पूर्ण करण्यासाठी वापरू शकता.

वाचा - UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! १ ऑक्टोबरपासून 'हे' महत्त्वाचे फीचर कायमस्वरूपी बंद होणार

दोन्ही विमा पॉलिसी का आवश्यक?
हेल्थ इन्शुरन्स आणि क्रिटिकल इलनेस इन्शुरन्स दोन्हीमध्ये महत्त्वाचे फरक आहेत. हेल्थ इन्शुरन्स तुम्हाला रुग्णालयाच्या खर्चापासून आर्थिक सुरक्षा देतो, तर क्रिटिकल इलनेस इन्शुरन्स गंभीर आजारांमुळे निर्माण होणारा मोठा आर्थिक भार कमी करण्यास मदत करतो. त्यामुळे, तुम्ही तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या आर्थिक भविष्यासाठी या दोन्ही पॉलिसींचा विचार करायला हवा.

Web Title: Why You Need Both Health and Critical Illness Insurance for Financial Security

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.