Lokmat Money > बिझनेस न्यूज > गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये

गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये

Sundar Pichai Salary Package : गुगलसारख्या महाकाय टेक कंपनीच्या सीईओला दरवर्षी किती पगार पॅकेज मिळतो हे तुम्हाला माहिती आहे का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2025 16:57 IST2025-04-29T16:56:33+5:302025-04-29T16:57:12+5:30

Sundar Pichai Salary Package : गुगलसारख्या महाकाय टेक कंपनीच्या सीईओला दरवर्षी किती पगार पॅकेज मिळतो हे तुम्हाला माहिती आहे का?

What is the salary of Google CEO Sundar Pichai? The company spent Rs 71 crore on security alone | गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये

गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये

Sundar Pichai Salary Package :गुगल, मेटा, अ‍ॅपल सारख्या कंपन्यांमध्ये नोकरी मिळाल्यानंतर हमखास एक प्रश्न विचारला जातो. किती कोटी रुपयांचे पॅकेज मिळाले? या पॅकेजचे आकडे वर्तमानपत्रांमध्ये मथळे बनतात. अशात जगातील सर्वात मोठी टेक कंपनी गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांना वर्षाला किती पगार असेल ह्याचा कधी विचार केला आहे का? विशेष म्हणजे पिचाई यांच्या सुरक्षेवर कंपनीने वर्षभरात तब्बल ७१ कोटी रुपये खर्च केले आहेत. या पैशात भारतात एखादा स्टार्टअप उभा राहू शकतो. दरम्यान, गुगलची मूळ कंपनी अल्फाबेटने पिचाई यांना दिल्या जाणाऱ्या पगाराचा खुलासा केला आहे.

सुंदर पिचाई यांच्या पगाराचा आकडा वाचून भोवळ येईल
२०२५ मध्ये अल्फाबेटने जारी केलेल्या प्रॉक्सी स्टेटमेंटनुसार, २०२४ मध्ये कंपनीने पिचाई यांना १.७ कोटी डॉलर्स (सुमारे ९२ कोटी रुपये) चे पॅकेज दिले आहे. ही रक्कम २०२३ मध्ये त्यांना मिळालेल्या ८८ लाख डॉलर्स (७५.६८ कोटी रुपये) पेक्षा खूपच जास्त आहे. सुंदर पिचाई यांना आतापर्यंत सर्वाधिक पैसे २०२२ मध्ये मिळाले, जेव्हा कंपनीने त्यांना २२.६ कोटी डॉलर्स (१,९४३.६० कोटी रुपये) चे पॅकेज दिले होते. ही रक्कम कोणत्याही सीईओला एका वर्षात मिळालेली सर्वाधिक होती.

पॅकेजमध्ये काय सुविधा मिळतात?
सुंदर पिचाई यांना मिळालेल्या या रकमेत अनेक गोष्टींचा समावेश आहे. यातील बहुतांश हिस्सा स्टॉकच्या स्वरूपात आहे, जो कंपनी त्यांना देते. पिचाई यांच्या मूळ पगाराबद्दल बोलायचे झाले तर तो आकडा खूप मोठा आहे. गुगल त्याला मूळ वेतन म्हणून सुमारे २० लाख डॉलर्स (१७.२० कोटी रुपये) देते. याशिवाय सुविधा आणि शेअरच्या स्वरूपातही कोट्यवधी रुपये मिळतात.

सुरक्षेवर ७१ कोटी खर्च
सुंदर पिचाई यांच्या सुरक्षेसाठी कंपनीने खर्च केलेली रक्कम सर्वांचे लक्ष वेधून घेते. एक प्रकारे, त्याच्या पगाराच्या पॅकेजइतकीच रक्कम त्याच्या सुरक्षेवरही खर्च केली जात आहे. अल्फाबेटने पिचाई यांच्या सुरक्षेवर ८२.७ लाख डॉलर (७१.१२ कोटी रुपये) खर्च केले, जे गेल्या वर्षीच्या ६७.८ लाख डॉलर्सपेक्षा २२% जास्त आहे. यामध्ये कोणत्याही लक्झरी सुविधेचा समावेश नाही, तर ही रक्कम पूर्णपणे त्यांच्या सुरक्षेच्या धोक्याचा विचार करून खर्च करण्यात आली आहे. यामध्ये घराच्या देखरेखीपासून ते प्रवास संरक्षण आणि अगदी वैयक्तिक ड्रायव्हर्सपर्यंत सर्व काही समाविष्ट आहे.

वाचा - बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव

पिचाई यांना त्यांच्या कर्मचाऱ्यापेक्षा ३२ पट जास्त पगार
२०२४ मध्ये सरासरी पूर्णवेळ गुगल कर्मचारी ३३१,८९४ डॉलर कमावतो, जो २०२३ च्या तुलनेत ५% जास्त आहे. ह्या पगाराचा आकडा सीईओच्या पगारापेक्षा खूपच कमी आहे. सीईओंचे पगार सरासरी कर्मचाऱ्यांच्या पगारापेक्षा अंदाजे ३२ पट जास्त आहे. काही लोक यावरुन प्रश्न उपस्थित करतात. पण, पिचाई यांनी कंपनीला एआय विकास आणि क्लाउड विस्तारासारख्या आव्हानांना तोंड देण्यास सक्षम केले. त्याचेच हे बक्षीस असल्याचे बोलले जाते.

Web Title: What is the salary of Google CEO Sundar Pichai? The company spent Rs 71 crore on security alone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.