Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > गुंतवणूकदारांच्या मनात ‘युद्ध’; बाजार पडल्यास काय करू?

गुंतवणूकदारांच्या मनात ‘युद्ध’; बाजार पडल्यास काय करू?

इतिहास सांगतो की, ज्या ज्या वेळी शेअर बाजार कोसळतो, त्यानंतर तो वेगाने वाढतो; या काळात गुंतवणूक टिकवून ठेवणे किंबहुना वाढवणे अधिक फायदेशीर ठरू शकते

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2026 04:21 IST2026-03-02T04:21:15+5:302026-03-02T04:21:45+5:30

इतिहास सांगतो की, ज्या ज्या वेळी शेअर बाजार कोसळतो, त्यानंतर तो वेगाने वाढतो; या काळात गुंतवणूक टिकवून ठेवणे किंबहुना वाढवणे अधिक फायदेशीर ठरू शकते

'War' in the minds of investors; What to do if the share market falls? | गुंतवणूकदारांच्या मनात ‘युद्ध’; बाजार पडल्यास काय करू?

गुंतवणूकदारांच्या मनात ‘युद्ध’; बाजार पडल्यास काय करू?

- चंद्रकांत दडस
लोकमत न्यूज नेटवर्क 
सध्याच्या घडीला अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धामुळे पुढील काही दिवस शेअर बाजार घसरणार हे अगदी शाळकरी मुलालाही कळेल. युद्धामुळे सोने - चांदीतील गुंतवणूक वाढणार असून, शेअर बाजार आपटण्याची भीती आहे. अशा स्थितीत आपण पॅनिक होत धडाधड शेअर्स व म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक काढून घेतो. मात्र, इतिहास सांगतो की, ज्या ज्या वेळी शेअर बाजार कोसळतो, त्यानंतर तो वेगाने वाढतो. त्यामुळे अशा काळात गुंतवणूक टिकवून ठेवणे किंबहुना वाढवणे अधिक फायदेशीर ठरू शकते.

युद्धाचे सावट दाटले की, बाजार डगमगतात. पण, भीती निर्माण करणारा घटक प्रत्येक वेळी युद्ध नसतो, तर ती असते अनिश्चितता. पुढे काय होईल, राजकीय समीकरणे कशी बदलतील, याची स्पष्टता नसल्याने आपण तत्काळ शेअर्स विकून मोकळे होतात. आतापर्यंत अनेकदा युद्धामुळे, कोरोनामुळे बाजार कोसळला आहे. मात्र, तो परिस्थिती सावरल्यानंतर अतिवेगाने वाढला आहे.

भारतीय बाजार कधी किती कोसळला होता?
वर्ष    कारण     घसरण (अंदाजे)
१९९२     हर्षद मेहता घोटाळा     १३%
२००८     जागतिक आर्थिक संकट    ६१%
२०१५     चीन संकट     ६%
२०१६     नोटबंदी     ८%
२०२०     कोरोना महामारी    ३५%
२०२२     रशिया युक्रेन युद्ध    १५%

सोन्याकडे ओघ
संघर्षाच्या काळात जगभरातील गुंतवणूकदार 'सेफ हेवन' म्हणून सोन्याकडे वळतात. यामुळे सोन्याच्या दरात वाढ होणे स्वाभाविक आहे. तुमच्या पोर्टफोलिओमध्ये सोन्याचा समावेश असेल, तर इक्विटीमधील घसरण सोन्यातील वाढीने भरून निघू शकते. 

'पॅनिक सेलिंग', पायावर धोंडा
जेव्हा क्षेपणास्त्रे डागली जातात, तेव्हा बाजार 'ओव्हररिॲक्ट' करतो. गुंतवणूकदार घाबरून आपले दर्जेदार शेअर्स कवडी मोल भावाने विकून टाकतात. अशा वेळी मोठे संस्थात्मक गुंतवणूकदार त्याच शेअर्सची स्वस्त दरात खरेदी करत असतात. लक्षात ठेवा, जोपर्यंत तुम्ही शेअर विकत नाही, तोपर्यंत तुमचा तोटा 'कागदावर' असतो. एकदा का भीतीपोटी विक्री केली की, तो तोटा कायमचा होतो.

जग अस्थिर वाटत असताना काय करावे?

एसआयपी थांबवू नका
बाजार खाली गेल्यावर तुम्हाला त्याच पैशात जास्त युनिट्स मिळतात. ही गुंतवणुकीची 'सेल' आहे, असे समजा.
या क्षेत्रावर लक्ष द्या 
अशा काळात डिफेन्स, तेल क्षेत्रातील कंपन्यांचे शेअर्स अनेकदा चांगली कामगिरी करतात.
अफवांपासून लांब राहा
सोशल मीडियावरील 'मार्केट क्रॅश'च्या अफवांना बळी पडू नका. आपली गुंतवणूक दीर्घकालीन ध्येयासाठी (मुलांचे शिक्षण, रिटायर्डमेंट) असेल, तर युद्धाच्या बातम्यांकडे दुर्लक्ष करा.

Web Title : युद्ध से निवेशकों में चिंता; बाजार गिरने पर क्या करें?

Web Summary : युद्ध के कारण बाजार में गिरावट अवसर प्रदान करती है। घबराकर न बेचें; निवेश बनाए रखें या बढ़ाएँ। रक्षा, तेल क्षेत्रों पर ध्यान दें। बाजार दुर्घटना की अफवाहों को अनदेखा करें; दीर्घकालिक लक्ष्यों के लिए निवेशित रहें।

Web Title : War worries investors; what to do if the market falls?

Web Summary : Market downturns due to war offer opportunities. Avoid panic selling; maintain or increase investments. Focus on defense, oil sectors. Ignore market crash rumors; stay invested for long-term goals.