lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > Vi युझर्ससाठी धक्का; १५ जानेवारीपासून महत्त्वाची सर्व्हिस 'या' शहरात होणार बंद

Vi युझर्ससाठी धक्का; १५ जानेवारीपासून महत्त्वाची सर्व्हिस 'या' शहरात होणार बंद

व्होडाफोन आणि आयडिया म्हणजेच Vi ने आपली एक सेवा बंद करण्याची योजना आखत आहे. १५ जानेवारी २०२१ पासून दिल्लीतील ३जी सीम सर्व्हिस बंद करणार असल्याची घोषणा कंपनीने केली आहे.

By देवेश फडके | Published: January 2, 2021 03:43 PM2021-01-02T15:43:54+5:302021-01-02T15:50:03+5:30

व्होडाफोन आणि आयडिया म्हणजेच Vi ने आपली एक सेवा बंद करण्याची योजना आखत आहे. १५ जानेवारी २०२१ पासून दिल्लीतील ३जी सीम सर्व्हिस बंद करणार असल्याची घोषणा कंपनीने केली आहे.

vi to stop 3g sim service in delhi circle from 15 january 2021 | Vi युझर्ससाठी धक्का; १५ जानेवारीपासून महत्त्वाची सर्व्हिस 'या' शहरात होणार बंद

Vi युझर्ससाठी धक्का; १५ जानेवारीपासून महत्त्वाची सर्व्हिस 'या' शहरात होणार बंद

Highlightsव्होडाफोन-आयडिया ग्राहकांसाठी बॅड न्यूजराजधानी दिल्लीत ३जी सीम सेवा बंद होणारसीमकार्ड ४जीमध्ये कन्व्हर्ट करण्यासाठी १५ जानेवारीपर्यंतचा वेळ

नवी दिल्ली :व्होडाफोन आणि आयडिया म्हणजेच Vi ने आपली एक सेवा बंद करण्याची योजना आखत आहे. या योजनेची सुरुवात झाली आहे. देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत १५ जानेवारी २०२१ पासून Vi ची 3G सीम सेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. Vi युझर्ससाठी ही बॅड न्यूज असल्याचे म्हटले जात असून, थ्रीजी सीमकार्ड धारकांनी आपले सीम लवकरात लवकर 4G मध्ये परिवर्तित करून घ्यावेत, असे सांगितले जात आहे. 

व्होडाफोन-आयडिया १५ जानेवारी २०२१ पासून दिल्लीतील ३जी सीम सर्व्हिस बंद करणार असल्याची घोषणा कंपनीने केली आहे. १५ जानेवारीपर्यंत ३जी सीमकार्ड धारकांना आपले सीमकार्ड ४जी मध्ये परिवर्तित करण्यासाठी केवळ १५ जानेवारीपर्यंतचा वेळ आहे. Vi ने आपल्या निर्णयाबद्दल संबंधित सर्व ग्राहकांना दूरध्वनी किंवा संदेशाद्वारे माहिती देण्यास सुरुवात केली आहे. 

गेल्या अनेक वर्षांपासून भारतात ४जी सेवा सुरू आहे. ४जी सेवेमुळे ग्राहकांना चांगला स्पीड मिळत आहे. रिलायन्स जिओच्या प्रवेशानंतर ४जी आणि मोबाइल सेवेत मोठी क्रांती घडून आली आहे. यामुळे संपर्क सेवा पुरवण्याऱ्या कंपन्यांमध्ये मोठी स्पर्धा निर्माण झाली असून, याचमुळे व्होडाफोन आणि आयडिया एकत्र आले आहे. मात्र, आता Vi ने आपले ३जी सीम सेवा बंद केली आहे. यापूर्वी Vi ने मुंबई आणि बेंगळुरू या दोन शहरात आपली ३जी सीम सेवा बंद केली असून, आता राजधानी दिल्लीत या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाच्या (ट्राय) माहितीनुसार, दिल्ली सर्कलमध्ये Vi चे १ कोटी ६२ लाखाहून अधिक ग्राहक आहेत. यापैकी ३जी सीम धारकांना १५ जानेवारीपर्यंत आपले सीम ४जी परिवर्तित करावे लागणार आहेत. 

 

Web Title: vi to stop 3g sim service in delhi circle from 15 january 2021

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.