lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > वैद्यकीय अधिकारी, सहाय्यक प्राध्यापक, अभियंत्यांसह अनेक पदांवर निघाली भरती; आजच अर्ज करा...

वैद्यकीय अधिकारी, सहाय्यक प्राध्यापक, अभियंत्यांसह अनेक पदांवर निघाली भरती; आजच अर्ज करा...

अर्जाची प्रक्रियाही सुरू झाली आहे. या रिक्त स्थानाचा तपशील, आवश्यक संकेतस्थळे या बातमीमध्ये दिले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2020 04:36 PM2020-08-01T16:36:55+5:302020-08-01T16:52:00+5:30

अर्जाची प्रक्रियाही सुरू झाली आहे. या रिक्त स्थानाचा तपशील, आवश्यक संकेतस्थळे या बातमीमध्ये दिले आहेत.

upsc recruitment 2020 sarkari naukri for medical officer assistant professor engineer apply upsc | वैद्यकीय अधिकारी, सहाय्यक प्राध्यापक, अभियंत्यांसह अनेक पदांवर निघाली भरती; आजच अर्ज करा...

वैद्यकीय अधिकारी, सहाय्यक प्राध्यापक, अभियंत्यांसह अनेक पदांवर निघाली भरती; आजच अर्ज करा...

नवी दिल्लीः केंद्र सरकारच्या विविध विभागांत नोकर भरती निघाली आहे. युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशनने (यूपीएससी) अनेक वेगवेगळ्या पदांसाठी रिक्त पदे भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. सहाय्यक प्राध्यापक, सहाय्यक अभियंता, वैद्यकीय अधिकारी, आर्किटेक्ट यासह अनेक पदांवर सरकारी नोकरी मिळण्याची संधी आहे. यासाठी यूपीएससीने आपल्या अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर एक अधिसूचना जारी केली आहे. अर्जाची प्रक्रियाही सुरू झाली आहे. या रिक्त स्थानाचा तपशील, आवश्यक माहिती बातमीमध्ये दिली आहे.

पदांची माहिती
वैद्यकीय अधिकारी / संशोधन अधिकारी - 36 पदे
सहाय्यक अभियंता-  3 पदे
विशेषज्ञ ग्रेड 3 सहाय्यक प्राध्यापक - 60 पदे
वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी - 21 पदे
आर्किटेक्ट (गट अ) - 1 पदे
एकूण पदांची संख्या - 121

अर्ज माहिती
या भरती प्रक्रियेत भाग घेण्यासाठी यूपीएससीच्या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावा लागेल.
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी प्रारंभ तारीख - 24 जुलै 2020.
अर्ज करण्याची अंतिम तारीख - 13 ऑगस्ट 2020
ऑनलाइन अर्ज छपाईची अंतिम तारीख - 14 ऑगस्ट 2020

अर्ज फी - एससी, एसटी, महिला आणि अपंग उमेदवारांसाठी अर्ज विनामूल्य आहे. इतर सर्व प्रकारच्या उमेदवारांना 25 रुपये अर्ज फी भरावी लागेल.

आवश्यक पात्रता
वेगवेगळ्या पदांसाठी शैक्षणिक पात्रता वेगळी मागविण्यात आली आहे. या सूचनेमध्ये आपल्याला सविस्तर माहिती मिळेल.
कमाल वयोमर्यादा देखील सर्व पदांसाठी स्वतंत्रपणे निश्चित केली गेली आहे 
वैद्यकीय अधिकारी - 35 वर्षे
सहाय्यक अभियंता - 30 वर्षे
सहाय्यक प्राध्यापक - 40 वर्षे
वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी - 35 वर्षे
आर्किटेक्ट - 40 वर्षे

Web Title: upsc recruitment 2020 sarkari naukri for medical officer assistant professor engineer apply upsc

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.