दवारका : देशातील सहकारी बॅँकांमध्ये अग्रगण्य असलेल्या दि कॉसमॉस को-ऑप. बॅँक लिमिटेडच्या नूतन बोधचिन्हाचे अनावरण येथील बनकर चौक (काठे गल्ली) शाखेमध्ये नाशिक एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष दिलीप फडके, ज्येष्ठ खातेदार रमणलाल गंग व उद्योजक भूषण महाजन यांच्या हस्ते करण्यात आले.बॅँकेने आपल्या तत्पर सेवेद्वारे ग्राहकांचा विश्वास संपादन केल्याचे प्रतिपादन यावेळी बोलताना प्रा. फडके यांनी केले. पुणे येथे १९०६ मध्ये स्थापन झालेल्या या बॅँकेचा व्यवसाय २५ हजार कोटींवर असून, सहा राज्यांमध्ये १३५ शाखा कार्यरत आहेत. अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, उपाध्यक्ष मिलिंद काळे, कार्यकारी संचालक विक्रांत पोंक्षे व ज्येष्ठ मार्गदर्शक डॉ़ मुकुंद अभ्यंकर यांच्या नेतृत्वात बॅँकेने अल्पावधीत प्रगती केल्याचे शाखा व्यवस्थापक ज्ञानेश्वर जाधव यांनी सांगितले. यावेळी ग्राहकांशी असलेल्या बांधिलकीची प्रतिज्ञाही सर्व कर्मचार्यांनी घेतली. (वाणिज्य प्रतिनिधी)फोटो २९ पीएचएसपीकॉसमॉस बॅँकेच्या नूतन बोधचिन्हाच्या अनावरणप्रसंगी भूषण महाजन, दिलीप फडके, रमणलाल गंग व ज्ञानेश्वर जाधव़
कॉसमॉस बॅँकेच्या बोधचिन्हाचे अनावरण
द्वारका : देशातील सहकारी बॅँकांमध्ये अग्रगण्य असलेल्या दि कॉसमॉस को-ऑप. बॅँक लिमिटेडच्या नूतन बोधचिन्हाचे अनावरण येथील बनकर चौक (काठे गल्ली) शाखेमध्ये नाशिक एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष दिलीप फडके, ज्येष्ठ खातेदार रमणलाल गंग व उद्योजक भूषण महाजन यांच्या हस्ते करण्यात आले.
By admin | Updated: October 1, 2014 00:05 IST2014-10-01T00:05:37+5:302014-10-01T00:05:37+5:30