Lokmat Money > बिझनेस न्यूज > ३० थकबाकीदारांकडे थकले ९५ हजार कोटी

३० थकबाकीदारांकडे थकले ९५ हजार कोटी

सरकारी बँकांच्या एकूण थकीत कर्जापैकी एक तृतीयांश रक्कम ३० थकबाकीदारांकडे आहे.

By admin | Published: March 20, 2015 11:31 PM2015-03-20T23:31:16+5:302015-03-20T23:31:16+5:30

सरकारी बँकांच्या एकूण थकीत कर्जापैकी एक तृतीयांश रक्कम ३० थकबाकीदारांकडे आहे.

Tired of 30 takers Rs. 95 thousand crores | ३० थकबाकीदारांकडे थकले ९५ हजार कोटी

३० थकबाकीदारांकडे थकले ९५ हजार कोटी

नवी दिल्ली : सरकारी बँकांच्या एकूण थकीत कर्जापैकी एक तृतीयांश रक्कम ३० थकबाकीदारांकडे आहे. हा आकडा ९५ हजार १२२ कोटी रुपये असल्याचे अर्थ राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी राज्यसभेत एका लेखी प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.
ही आकडेवारी डिसेंबर २०१४ पर्यंतची आहे. रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार सरकारी बँकांकडील एकूण थकीत कर्जाची रक्कम २ लाख ६० हजार ५३१ कोटी रुपये इतकी आहे. त्यातील सर्वांत मोठ्या ३० थकबाकीदारांकडेच सुमारे ३६.५ टक्के कर्जे थकीत असल्याचे सिन्हा यांनी स्पष्ट केले. सप्टेंबर २०१४ च्या रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीनुसार १० कोटी रुपयांहून अधिक रकमेचे कर्ज थकीत असलेल्यांची संख्या २८९७ आहे. अशा थकबाकीदारांकडे १ लाख ६० हजार १६४ कोटी रुपये थकीत आहेत.
कोट्यवधींची थकबाकी असलेले हे थकबाकीदार बडे लोक आहेत. ५ ते १0 हजार थकविणाऱ्या शेतकऱ्यांना सळो की पळो करून सोडणाऱ्या बँका बड्या धेंडांच्या थकबाकीकडे सोयीस्कर दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येते. (लोकमत न्यूज नेटवर्क)

४एका प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी सांगितले, की क्रेडिट कार्डशी संबंधित ७४४३ प्रकरणे असून, यातील एकूण रक्कम २९ कोटी रुपये आहे.
४ एटीएम कार्डशी संबंधित प्रकरणात ११ कोटी रुपयांचा प्रश्न असून, अशी १७४३ प्रकरणे दाखल आहेत.

Web Title: Tired of 30 takers Rs. 95 thousand crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.