lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > १ फेब्रुवारीपासून होणार ‘या’ नियमांमध्ये बदल

१ फेब्रुवारीपासून होणार ‘या’ नियमांमध्ये बदल

Navi Delhi: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन १ फेब्रुवारीला संसदेत अर्थसंकल्प सादर करणार आहेत. परंतु याच १ तारखेपासून अनेक नियमांमध्ये बदल केले आहेत.  पेन्शन फंडातून पैसे काढण्याच्या नियमात बदल  पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरणाने (पीएफआरडीए) बदलेले नियम १ तारखेपासून लागू होतील.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2024 05:47 AM2024-01-29T05:47:15+5:302024-01-29T05:47:30+5:30

Navi Delhi: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन १ फेब्रुवारीला संसदेत अर्थसंकल्प सादर करणार आहेत. परंतु याच १ तारखेपासून अनेक नियमांमध्ये बदल केले आहेत.  पेन्शन फंडातून पैसे काढण्याच्या नियमात बदल  पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरणाने (पीएफआरडीए) बदलेले नियम १ तारखेपासून लागू होतील.

There will be changes in these rules from February 1 | १ फेब्रुवारीपासून होणार ‘या’ नियमांमध्ये बदल

१ फेब्रुवारीपासून होणार ‘या’ नियमांमध्ये बदल

नवी दिल्ली - केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन १ फेब्रुवारीला संसदेत अर्थसंकल्प सादर करणार आहेत. परंतु याच १ तारखेपासून अनेक नियमांमध्ये बदल केले आहेत. 
पेन्शन फंडातून पैसे काढण्याच्या नियमात बदल  पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरणाने (पीएफआरडीए) बदलेले नियम १ तारखेपासून लागू होतील. मुलांचे उच्च शिक्षण, मुलांचे विवाह, घरबांधणी किंवा फ्लॅटखरेदीसाठी फंडातून आंशिक स्वरूपात रक्कम काढता येईल. 

मायक्रोसॉफ्टची सेवा महागणार 
कंपनीने मायक्रोसॉफ्ट ३६५ आणि डायनॅमिक्स ३६५ सह ऑनलाइन सेवांचे दर १ फेब्रवारीपासून  ६ टक्क्यांनी वाढवले आहेत.

बल्क ई-मेलवर निर्बंध
गुगल तसेच याहू आदी कंपन्यांकडून ग्राहकांना बल्क ई-मेल पाठवले जात असतात. दरदिवशी ५ हजारांहून अधिक ई-मेल पाठवणाऱ्या सर्व डोमेनला यापुढे आपले सर्व्हर ‘डीएमएआरसी’ या संरक्षण प्रोटोकॉलला अनुरूप करावे लागतील. स्पॅमचे प्रमाण ०.३ टक्क्यांपेक्षा कमी ठेवावे लागेल. नियमांचे पालन न केल्यास ई-मेल स्वीकारले जाणार नाहीत तसेच बाउन्स होतील. 

Web Title: There will be changes in these rules from February 1

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.